समांतर क्रांती / खानापूर आज शनिवारी (ता.१६) एक बिबट्या चक्क महामार्गावर मुक्तसंचार करतांना आढळला. बराचकाळ तो रस्त्याशेजारी थांबला होता. वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी त्याला जंगलात हकलले. चोर्ला महामार्गावरील घाटात दुपारी सदर बिबट्या घाटातील रस्त्यावर फिरत होता. यावेळी तेथून जाणाऱ्यांनी वाहने थांबवून अगदी जवळून त्याचे चित्रीकरण केले. त्याची माहिती वनखात्याला देण्यात आल्यानंतर वनाधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन बिबट्याला जंगलात […]
समांतर क्रांती / खानापूर तालुक्यातील मोदेकोप्प येथे ७९ वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आले. यावेळी जवान मोनेश्री लोकोळकर व विनोद गावडे यांच्याहस्ते ध्वजरोहण झाले. याप्रसंगी शाळा सुधारणा समिती अध्यक्ष मनोहर गावडा, कल्लाप्पा गावडे, वसंत केसरेकर, मष्णू पाटील, शिवाजी लोकोळकर, तुकाराम कुलम, शिक्षक एम.आर.पाटील आदींसह पालक, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम […]
समांतर क्रांती / खानापूर मणतुर्गा येथे श्री देव रवळनाथ मंदिराचा कळस स्लॅब व बांधकामाचा शुभारंभ समारंभपूर्वक करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दूध डेअरीचे माजी अध्यक्ष बाबुराव पाटील होते. यावेळी उपस्थित पाहुण्यांनी मंदिर बांधकामासाठी भरघोस देणग्या दिल्या. प्रास्ताविक रवळनाथ मंदिर जीर्णोद्धार समितीचे अध्यक्ष आबासाहेब दळवी यांनी केले. मंदिराच्या कळसाचे स्लॅब-बांधकामाचा शुभारंभ खानापूर को-ऑप.बँकेचे चेअरमन अमृत शेलार यांच्या […]
समांतर क्रांती / खानापूर तालुक्यातील कान्सूली येथील प्राथमिक मराठी शाळेत 79 स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष शंकर किनयेकर यांनी ध्वजारोहण केले. यावेळी महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. स्वातंत्र्य दिनाचे औचीत्य साधून रोटरी क्लब ऑफ बेळगामने दिलेल्या दोन संगणकाचे हस्तानंतरण करण्यात आले. शाळेच्यावतीने […]
समांतर क्रांती / खानापूर अनेक दशकांपासून हजारो विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या मणतुर्गा येथील मराठी शाळेच्या इमारतीचे नुतनीकरण करण्याचा संकल्प आज शुक्रवारी (ता.१५) स्वातंत्र्यदिनी करण्यात आला. यावेळी शाळा सुधारणा समितीच्या सदस्यांनी शाळेच्या उभारणीसाठी देणग्या दिल्या. स्वातंत्र्यदिनानिमित्त शाळेच्या आवारात शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष ईश्वर बोबाटे यांच्याहस्ते करण्यात आले. तर महात्मा गांधीच्या प्रतिमेचे पूजन उपाध्यक्ष नारायण पाटील व डॉ. बाबासाहेब […]
प्रियसीचा खून करून प्रियकराची आत्महत्या; चाकूने केले सपासप वार समांतर क्रांती / खानापूर प्रियकराने प्रियसीवर चाकूने सपासप वार करून ठार केले. नंतर स्वत:वरही चाकूने वार करून घेत आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील बिडी येथे घडली आहे. मृत महिलेचे नाव रेश्मा तिरवीर (२९) व प्रियकराचे नाव आनंद सुतार असे असून दोघांमध्ये गेल्या कांही वर्षांपासून अनैतिक संबंध सुरू […]
समांतर क्रांती / खानापूर निवडणूक आयोग आणि मोदी सरकारच्या ‘व्होट चोरी’ची पोलखोल झाल्याच्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये जागृती करण्यासाठी रविवारी (ता.१७) सकाळी ६ वाजता खानापूर ते नंदगड अशी मतदार अधिकार यात्रा आयोजित करण्यात आली आहे. या यात्रेचे नेतृत्व अखिल भारतीय काँग्रेसच्या सचीव माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर करणार आहेत. अखिल भारतीय कॉंग्रेसने देशभर मतदार अदिकार यात्रा काढण्याचे […]
समांतर क्रांती / नंदगड खानापूर ते नंदगड आणि पुढे लिंगनमठपर्यंतच्या बससेवेचा पुरता बोजवारा उडाला आहे. खानापूर आगाराच्या मोजक्याच बसगाड्या या मार्गावर धावतात. त्यातही अनेक बस नादुरूस्त आहेत. अनियमीत धावणाऱ्या बसमुळे प्रवाशी आणि विशेषत: विद्यार्थ्यांची हेळसांड चालली आहे. बससेवा सुरळीत करण्याकडे कुणाचेच लक्ष नसल्याने प्रवाशी आणि विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. या मार्गावर हल्याळ आणि […]
समांतर क्रांती / खानापूर डॉ. आंबेडकर ब्रिगेडची बैठक सोमवारी (ता.११) येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विश्रामगृहात पार पडली. बैठकीत ब्रिगेडचा संघटनात्मक विस्तार करण्याचा व शोषीत समाजाच्या समस्यांविरोधात आंदोलनास्त्र उगारण्याचा निर्णय घेण्यात आला. अध्यक्षस्थानी ब्रिगेडचे संस्थापक लक्ष्मण मादार होते. अर्जून कांबळे यांनी उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्ताविक केले. त्यानंतर बोलतांना अध्यक्ष लक्ष्मण मादार म्हणाले, तालुक्यातील दलित मागास समाजांवरील […]
समांतर क्रांती / खानापूर शहराच्या विविध भागात घरफोड्या केल्याच्या आरोपावरून दोघांना पोलिसांनी मुद्देमालासह अटक करून त्यांची रवानगी कारागृहात केली आहे. दीपक उर्फ रोहन नागेंद्र मातंगी (मूळचा हलकर्णी-खानापूर सध्या रा. मच्छे) व शिवनागय्या मतय्या उमचगीमठ (मूळचा गुजमागडी-गदग सध्या रा. हुबळी) अशी या चोरट्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून ८६.०६ ग्रॅम सोन्याचे व चांदीचे दागिणे जप्त करण्यात आले आहेत. […]