समांतर क्रांती / खानापूर A soldier from Khanapur died on the spot in a bike accident. दुचाकीच्या अपघातात खानापुरातील जवान जागीच ठार झाल्याची घटना आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली. सुरज मोहन द्रौपदकर (वय २९, रा. विद्यानगर-खानापूर) असे मयताचे नाव असून तो भारतीय लष्करात सेवारत होता. घटनेची नोंद खानापूर पोलिसांत झाली आहे.सुरज हा खानापूरहून बेळगावकडे […]
समांतर क्रांती / खानापूर खानापूर तालुक्यातील रस्त्यांची चाळण झाली असून सर्वच रस्ते जीवघेणे बनले आहेत. तिओली रस्त्यावरील खड्ड्यांनी एका महिलेचा बळी घेतला असून अजून किती बळी गेल्यानंतर तालुक्यातील लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांना जाग येणार असा संतप्त प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. महिनाभरापूर्वी तिओली ते तिओली पुलापर्यंतच्या खड्डयांतील रस्त्यावर दुचाकीवरून पडून तिओली येथील हभप लक्ष्मी रामू गावडा […]
अॅड. एच.एन.तथा हिंदूराव देसाई यांचा जन्म कापोली या खानापूर तालुक्यातील छोट्याशा गावात बर्यापैकी सधन घराण्यात झाला असला तरी त्या काळात हे गाव तसे दुर्गमच होते. आजच्यासारख्या सोयी-सुविधा त्या काळात नव्हत्या. मात्र शिकण्याची जिद्द असल्याने अॅड. एच.एन. देसाई यांनी वकिलीचे शिक्षण घेत त्या भागातील पहिले वकील होण्याचा मान मिळविला. त्यावेळी त्यांचे मोठे कौतूक झाले. निष्णात […]
समांतर क्रांती / खानापूर तालुक्यातील नंदगड येथील जेसीएस आवारातील उर्दू शाळेवर झाड कोसळल्याची घटना ताजी असतांनाच एका शाळेची वर्गखोली जमीनदोस्त झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत केवळ सुदैवानेच विद्यार्थी बचावले आहेत. दोन्ही घटनांत केवळ सुदैवाने अनर्थ टळला असला तरी तालुक्यातील शाळा खोल्यांची स्थिती पाहता विद्यार्थ्यांच्या मानेवर टांगती तलवार असल्याचेच या घटनांवरून दिसून येत आहे. तालुक्यातील […]
समांतर क्रांती / खानापूर खानापूर शहर चारही बाजुनी अफाट पसरले आहे. त्यात नव्या उपनगरांची भर पडत आहे. पण, या उपनगरांची आवस्था दुर्गम खेड्यांहून भयानक आहे. मुलभूत सुविधाच देण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे, त्यात विकास कुठून होणार? हा प्रश्न आहे. शहरापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या हलकर्णी या गावाची अशी दूरवसस्था आहे. गावाला अनेक समस्यांनी विळखा घातला आहे. […]
समांतर क्रांती / खानापूर खानापूर- जांबोटी रस्त्यावरील रामगुरवाडी फाट्यावर एलेक्ट्रीकल्स दुकान फोडून अज्ञातांनी सुमारे दीड लाखांचे साहित्य चोरल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे यामध्ये चोरट्यांनी दुकानदाराने दोनच दिवसांपूर्वी खरेदी केलेली मोटर वायडींगची तांब्याची तार चोरल्यामुळे बेळगावातील तांबे चोरीचे लोण खानापूरात पोहचल्याची चर्चा आहे. अलिकडच्या काळात चोरीच्या घटनांत प्रचंड वाढ झाली असून पोलिस खात्याने चोरट्यांचा शोध […]
समांतर क्रांती / खानापूर Tree fell on school.. Only luck saved disaster. शाळांमधील समस्यांमुळे आधीच विद्यार्थ्यांची पुरेवाट होत असतांना निसर्गाने सुध्दा प्रताप दाखविण्यास सुरूवात केल्यामुळे पालकांची चिंता वाढली आहे. सोमवारी (ता. २८) नंदगड येथील जेसीएस आवारातील उर्दू शाळेच्या वर्गखोलीवर झाड कोसळल्याची घटना घडली. ही घटना रात्री घडल्यामुळे सुदैवाने अनर्थ टळला. नंदगड येथील जेसीएस आवारातील समस्यांमुळे […]
एखादा माणूस किती प्रतिभावंत असावा? विविध क्षेत्रात मुसाफिरी करणारी माणसं क्वचितच आढळतात. अशा माणसांच्या अंगी हे जे अष्टपैलू गुण असतात, ते वारसा हक्काने तर येतातच. शिवाय त्यांच्या कार्यकर्तृत्वातून त्यांच्या वर्तमानाला प्रकाशमय करून सोडतात. विशेष म्हणजे अशी माणसं समाजासाठी आदर्शवत दीपस्तंभ बनतात. असेच एक अष्टपैलू व्यक्तीमत्व म्हणजे आबासाहेब नारायणराव दळवी. तेजस्वी यशाची गरूडभरारी घेतांना त्यांना त्यांच्या […]
समांतर क्रांती / खानापूर नंदगड येथील जॉईंट सेंट्रल स्कूलच्या आवारात ‘जलजीवन मिशन’ योजनेंतर्गत जलवाहिनी घातली गेली आहे. पण, त्या कामासाठी आवारातील रस्ते, मैदानात खोदाई करण्यात आली. परिणामी, खड्डे पडले आहेत. तसेच चिखलामुळे विद्यार्थ्यांना आवारात वावरणे मुश्किल झाले आहे. ग्राम पंचायतीने या प्रकाराकडे साफ दुर्लक्ष चालविल्यामुळे पालक-विद्यार्थ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. आधीच मद्यपींचा अड्डा बनत […]
समांतर क्रांती / खानापूर वडगाव- बेळगाव येथील के.एल.ई.चे शताब्दी चॅरिटेबल हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रशांत देसाई आणि गर्लगुंजी ग्राम पंचायत सदस्य प्रसाद पाटील यांच्यात झालेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर गर्लगूंजी, निट्टुर, तोपिनकट्टी, बरगाव, बैलूर या गावांना नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून दत्तक घेतले जाणार आहे. प्रसाद पाटील यांनी यासाठी प्रयत्न केले. अखेर त्यांच्या या प्रयत्नांना यश आल्याने त्यांचे या […]