समांतर क्रांती / नंदगड समाजात आजही अनेक दानशूर व्यक्ती आहेत, जे संकट काळात धावून येतात. त्याची प्रचिती गेल्या आठवडाभरात आली. बेकवाड येथील शेतकरी गुंजाप्पा पाटील यांची बैलजोडी पाण्यात बुडून त्यांना ऐन हंगामात मोठा आर्थिक फटका बसला होता. त्यांना अनेकांनी आर्थिक मदत करीत दिलासा दिला. जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक माजी आमदार अरविंद पाटील यांनी घटनेनंतर तात्काळ […]
समांतर क्रांती / खानापूर नुकताच खानापूर पोलिसांनी मोठी कारवाई करीत चार वेगवेगळ्या चोरीच्या गुन्ह्यात तीन चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या असतांना अद्यापही शहरातील चोरीच्या घटनांना ब्रेक लागलेला नाही. दोन दिवसांपूर्वी शहरातील पेट्रोल पंपवर लावलेली दुचाकी चोरट्यांनी लांबविली आहे. मणतुर्गा येथील विठ्ठल शांताराम पाटील यांनी हिरोहोंडा – स्प्लेंडर दुचाकी (KA22 EG9891) पेट्रोलपंपवर लावली होती. ती अज्ञातांनी चोरली आहे. […]
समांतर क्रांती / खानापूर शहरातील सर्व्हे क्र. ९३/६/१ ही जमिन गायरान म्हणून नोंद असतांना तेथे कांहीनी अतिक्रमण करून बेकायदा बांधकाम केल्याचा आरोप करीत आंबेडकर ब्रिगेडने तहसील कार्यालयावर हालगी मोर्चा काढला. विनाविलंब जमिनीची सरकारदरबारी नोंद करावी तसेच बेकायदा बांधकाम भूईसपाट करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. शाहूनगरच्या बाजुला असलेली सदर जमिनीचा वाद न्यायालयात प्रलंबीत आहे. […]
समांतर क्रांती / खानापूर खानापूर तालुक्यात सध्या शेतकरी मेटाकुटीस आला आहे. कारण, एकतर यंदा भात पेरणीवर संक्रांत ओढवली; त्यात भात लागवड लांबली आहे. विशेष म्हणजे मजुरांअभावी भात रोपणीची कामे खोळंबली असतांना येथील कृषी अधिकाऱ्यांनी अकलेचे तारे तोडत तालुक्यात चक्क ९९ टक्के पेरणी उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे म्हटले आहे. एकप्रकारे शेतकऱ्यांची कृषी अधिकाऱ्यांनी उंठावरून शेळ्या हाकण्याचा प्रकार […]
समांतर क्रांती / लोंढा Londa: One killed on the spot in accident. रामनगर -धारवाड मार्गावरील लोंढा पोलीस स्थानक हद्दीतील घार्ली क्रॉसजवळ कारने झाडाला धडक दिल्याने एक ठारजण झाला. अपघातात तिघे जखमी झाले आहेत. जखमींवर बेळगाव येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सदर कार (के.ए. २२ पी ६३२५) हुबळीहून गोव्याकडे निघाली होती. घार्ली क्रॉसजवळील वळणावर चालकाचा ताबा […]
समांतर क्रांती / खानापूर तालुक्यातील बेकवाड येथील शेतकरी गुंजाप्पा विठ्ठल पाटील या शेतकऱ्याची बैलजोडी बुधवारी (ता. १६) तलावात बुडून मरण पावली होती. त्यामुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले होते. याबाबत गर्लगूंजी ग्राम पंचायत सदस्य प्रसाद विठ्ठल पाटील यांनी बेकवाड या ठिकाणी गुंजाप्पा पाटील या शेतकऱ्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. त्यांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे […]
समांतर क्रांती / खानापूर khanapur taluka panchayat येथील तालुका पंचायतचे कार्यकारी अधिकारी इरणगौडा एगणगौडर यांच्यासह अन्य ११ कार्यकारी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची शिफारस नागरी हक्क अंमलबजावणी संचनालयाचे पोलिस अधिक्षक रविंद्र गडादी यांनी सहायक पोलिस महासंचालंकाकडे केली आहे. १५ व्या आर्थिक योजनेंतर्गत अनुसूचीत जाती आणि जमातीच्या विकासासाठी वाटप केलेल्या निधीचा दुरूपयोग केल्याचा ठपका जिल्ह्यातील १२ ता.पं.च्या कार्यकारी […]
समांतर क्रांती / खानापूर Will there be a ‘Congress-BJP’ alliance in Khanapur? Who will be the candidate? जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या राजकारणात दररोज नवनव्या घडामोडी घडत आहेत. आगामी निवडणूक भाजप विरुध्द भाजप आणि काँग्रेसविरुध्द काँग्रेस अशीच होणार हे ओपन सिक्रेट आहे. दरम्यान, काँग्रेसच्या आमदाराने भाजपच्या आमदारांशी संधान बांधल्याची चर्चा असून दोघांमध्ये दिलजमाई झाली आहे. भाजपचे आमदार […]
समांतर क्रांती / खानापूर Citizens are suffering unnecessarily due to unprofessional work carried out in many places. In addition, there is a risk of accidents. ‘सरकारी काम सहा महिने थांब’ ही म्हण प्रचलित असतांनाच ‘करायला गेले सोय, झाली गैरसोय’ अशी नवीच म्हण खानापूर तालुक्यात रुढ होऊ लागली आहे. अनेक ठिकाणी अवैद्यानिकरित्या झालेल्या कामांमुळे नागरिकांना नाहक […]
समांतर क्रांती / खानापूर पशूधन हीच शेतकऱ्याची संपत्ती असते. त्यामुळे शेतकरी आपल्या जनावरांना पोटच्या पोरांप्रमाणेच सांभाळत असतो. जनावरेही आपल्या मालकाला जीव लावतात. पण, एखाद्या घटनेत जनावरांवर संकट ओढवल्यास मालकाची काय अवस्था होते, याची प्रचिती काल बेकवाड येथे आली. दोन बैल पाण्यात बुडून ठार झाल्याच्या घटनेनंतर मालक आणि त्याच्या मुलांनी चालविलेला आक्रोश हृदय पिवळटून टाकणारा होता. […]