समांतर क्रांती वृत्त / खानापूर येथील उद्योजक दयालाल पटेल (वय ६५) हे मंगळवारपासून (ता.८) बेपत्ता आहेत. त्यांचे चप्पल मलप्रभा नदीच्या घाटावर आढळून आल्याने संशय व्यक्त केला जात आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांचा शोध चालविला असला तरी ते कोठेच आढळून आलेले नाहीत. त्यामुळे नदी पात्रातही त्यांचा शोध घेण्यात आला. पण, त्यातही यश आलेले नाही. सदर व्यक्त कुणाला […]
समांतर क्रांती वृत्त / खानापूर परिश्वाड रस्त्यावर शहराजवळ पडलेले खड्डे भरून कांहीनी श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला. पण, त्याचा उलट परिणाम झाला. आधीच खड्ड्यांमुळे त्रस्त असलेल्या प्रवाशांची आवस्था गीतून फुफाट्यात अशी झाली होती. आज गुरूवारी (ता. १०) समांतर क्रांतीने यावर प्रकाश टाकल्यानंतर लागलीच सार्वजनिक बांधकाम खात्याने खडी टाकून रस्ता चिखलमुक्त केला. दरम्यान, आता यावरून भाजपमध्येच एकमेकांवर […]
समांतर क्रांती वृत्त: बेळगाव मंडोळी येथील काजू फॅक्टरीतून २ हजार ४४९ किलो काजूची चोरी केल्याप्रकरणी खानापूर तालुक्यातील उचवडे येथील तरूण महादेव तुकाराम पाटील (वय ३०) याला बेळगाव ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून ४२ पोती काजू आणि ट्रक (केए २२ सी ९३८७) यासह इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. पाच दिवसांपूर्वी (ता.५) मंडोळी येथील बाळासाहेब […]
समांतर क्रांती वृत्त खानापूर तालुक्यातील रस्त्यांची चाळण झाली आहे. लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे आता खड्डे बुजविण्यासाठी ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्त्यांना श्रमदान करावे लागत असल्याने तालुक्यातील सत्ताधारी भाजप, राज्यातील सत्ताधारी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांवर नामुष्की ओढवली आहे. नुकताच शहरातील पारिश्वाड रस्त्यावरील खड्डे भाजपच्या कार्यकर्त्यांनी बुजविले. पण, त्यांचे जनसामान्यांतून कौतूक होण्याऐवजी नागरीकांतून त्यांच्याबद्दल किव व्यक्त केली जात आहे. […]
समांतर क्रांती / नंदगड पुणे-बंगळूर महामार्गावरील विचित्र अपघातात नंदगड येथील ३० वर्षीय तरूण ठार झाल्याची घटना काल रविवारी (ता.६) घडली. रफिक बशिरअहमद जांबोटी (वय ३०, रा. नंदगड) असे मयताचे नाव असून तो महामार्गावरील दोन ट्रकचा अपघात पाहत असतांना त्याच्यासह अन्य एका दुचाकीस्वारावर काळाने घाला घातला. या अपघातात शिवाप्पा चंबाप्पा शहापूर (६३, रा. हुबळी) हा दुचाकीस्वार […]
मंडे स्पेशल / चेतन लक्केबैलकर पावसाने उसंत घेतल्याने खानापूर तालुक्यात भाताच्या रोपलावणीला जोर आला आहे. पण, रोपांची टंचाई आणि मजुरांची कमतरता यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. पावसाच्या लहरीपणामुळे ओल्या दुष्काळचे ढग दाटले आहेत. तर तालुक्याच्या पश्चिम आणि दक्षिण भागात जंगली श्वापदांनी उच्छांद मांडला आहे. रस्त्यांच्या दूरवस्थेमुळे प्रवाशी घायकुतीला आले असून अपघातांचा आलेख वाढत चालला आहे. […]
समांतर क्रांती / खानापूर खानापूर तालुक्यातील सर्रास रस्त्यांची चाळण झाली आहे. राज्य महामार्गांची दूरवस्था अपघातांना निमंत्रण देत आहेच, पण गावांच्या संपर्क रस्त्यावरील खड्ड्यांनी सुध्दा प्रवाशांचे कंबारडे मोडले आहे. लोकप्रतिनिधी आणि अधिकारी रस्त्यांची डागडुजी करण्यात अपयशी ठरल्यामुळे आता लोकांनाच आपापल्या गावच्या रस्त्यांवरील खड्डे भरण्याची वेळ आली आहे. ग्रामस्थ श्रमदान करून रस्त्यांची डागडुजी करीत असल्याने त्यांचे कौतूक […]
समांतर क्रांती / खानापूर कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी स्पर्धेला सामोरे जाणे आवश्यक आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्राथमिक अवस्थेत स्पर्धा परीक्षांची तोंड ओळख झाल्यास भविष्यात त्यांना करिअरची वाट निवडणे सोपे ठरते. स्पर्धा परीक्षा, करिअर घडवण्याचे सर्वात उत्तम माध्यम आहे. त्या दृष्टीने पालकांनी अभ्यासाबरोबरच स्पर्धा परीक्षांसाठी पोषक वातावरण निर्माण करावे. मनाजोगे करिअर निवडून समाज व राष्ट्रसेवेचा राजमार्ग […]
समांतर क्रांती / खानापूर गर्लगुंजीसह इदलहोंड, निट्टूर, बरगाव ग्राम पंचायत हद्दीतील शेकडो गावातील नागरिक, विद्यार्थ्यांना त्यांच्या शासकीय कामकाजासाठी जांबोटीला जावे लागते. त्यासाठी सुमारे २५ कि.मी.चा प्रवास करावा लागतो. त्यातही सदर काम एका फेरीत झाले नाही तर संबंधीतांची परवड होते. करिता, गर्लगुंजी येथे नेम्मदी केंद्र सुरू करून दिलासा द्यावा, अशी मागणी महसूल मंत्री कृष्णा भैरेगौडा यांच्याकडे […]
खानापूर: तिओली (सध्या राहणार हिंदू नगर-खानापूर) येथील रहिवाशी व विमा प्रतिनिधी पांडुरंग शांताराम हेब्बाळकर (वय ५५) यांचे आज (ता. ०४) सकाळी ११ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. आज सायंकाळी पाच वाजता तिओली येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, चिरंजीव, कन्या, भाऊ व वहिनी असा परिवार आहे. ते भाजपचे युवानेते व सामाजिक कार्यकर्ते किशोर […]