समांतर क्रांती / खानापूर थोर विचारवंत, समाजसुधारक, साहित्यिक आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील आग्रणी पत्रकार केशव सीताराम ठाकरे यांचा आज स्मृतिदिन. यनिमित्ताने येथील मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठान संचालित प्रबोधनकार ठाकरे वाचनालयात त्यांना अभिवादन करण्यात आले. प्रारंभी प्रतिष्ठानचे अध्यक्ष नारायण कापोलकर आणि खजिनदार ईश्वर बोबाटे यांनी प्रबोधनकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. सचिव वासुदेव यांनी प्रबोधनकरांच्या कार्याचा आढावा घेताना […]
समांतर क्रांती / खानापूर चालत जाणाऱ्या तरुणाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारदरम्यान मृत्यू झाला. ही घटना खानापूर – जांबोटी मार्गांवर सोमवारी (ता. 17) घडली होती. शिवम संजय कुंभार (17, रा. नागूर्डावाडा) असे या तरुणाचे नाव आहे. शिवम हा नेहमीप्रमाणे घरापासून मोदेकोप फाट्यापर्यंत फिरायला गेला होता. तो घरी परत येत असताना त्याला […]
समांतर क्रांती / खानापूर अज्ञात वाहनाच्या धडकेत हरण ठार झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावर तिओलीवाडा क्रॉसनजीक रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. सदर हरण रस्ता ओलंडत असतांना त्याला वाहनाची धडक बसली. वन खात्याच्या अधिकाऱ्यांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. गुंजी विभागाचे सहायक वनपाल राजू पवार यांनी घटनास्थळी घटनेची शहानिशा केली. त्यानंतर उपवनसंरक्षक सुनिता निंबरगी […]
समांतर क्रांती / खानापूर बालदिनाचे औचित्य साधत गर्लगुंजी गावातील होतकरू खेळाडूंना खेळाची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने एकलव्य क्रीडा केंद्र गर्लगुंजी यांच्या पुढाकाराने गावातील ज्येष्ठ व्यक्ती आणि पालकांच्या उपस्थितीत 50 स्पोर्ट्स जर्सी,आणि स्पोर्ट्स किट बॅग बॉटल वितरण करण्यात आल्या. गाव व्यसन मुक्त व्हाव,खेळांची आवड निर्माण व्हावी, खेळातून करिअर घडावे, हाच मुख्य उद्देश असल्याचे ग्राम पंचायत […]
समांतर क्रांती / चेतन लक्केबैलकर कारवारप्रमाणेच बेळगाव जिल्ह्यातील मराठीबहूल गावांमध्ये कन्नड शाळा सुरू करून कानडीकरणाचा वरवंटा फिरविण्याचा डाव कर्नाटक सरकारने आखला आहे. त्याची अमलबजावणी सुरू झाली असून बेळगाव ग्रामीणसह खानापूर तालुक्यातील मराठी गावांमध्ये कन्नड शाळा सुरू करण्याचा अद्यादेश शिक्षण खात्याने जारी केला आहे. बेळगाव तालुक्यातील सावगाव आणि बाची येथील मराठी शाळांच्या परिसरात कन्नड शाळा सुरू […]
समांतर क्रांती /खानापूर जमिनीच्या सर्वेक्षणाचा उच्च न्यायालयाचा आदेश असतानाही त्याची कार्यवाही करण्यास टाळाटाळ करणारे खानापूरचे तहसीलदार दुंडाप्पा कोमार यांची तात्काळ बदली करण्याचा आदेश उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाने बजावला आहे. असोगा ता. खानापूर येथील सर्वे नंबर 108 मधील 2 एकर 20 गुंठे जमीनीच्या सर्वेक्षणासाठी उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठात 114086/2019 ही याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर […]
समांतर क्रांती / खानापूर विद्युत तारांचा स्पर्श होऊन दोन हत्ती दगावल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. यामुळे खानापूर तालुक्यातील वनविभागात खळबळ उडाली आहे. तालुक्यातील सुळेगाळी गावाजवळ शेतवडीत मुक्तसंचार करणाऱ्या हत्तीवर काळाने घाला घातला आहे. याबाबतची अधिक माहिती अशी, गणपती गुरव यांच्या शेतात सौर कुंपण लावण्यात आले होते. त्यावर हेस्कॉमच्या वीज तारा तुटून पडल्याने अतिरिक्त […]
समांतर क्रांती / बेळगाव एकीकडे काळा दिन पाळण्यास परवानगी नाकरणाऱ्या जिल्हाप्रशासनाने मराठी भाषीकांच्या हक्कांची पायमल्ली चालविली आहे, तर दुसरीकडे बेळगाव महानगरपालिका आयुक्त आणि पोलिसांनी तुघलकी कारभार चालविला आहे. मनपाच्या कर्मचाऱ्यांनी मुठभर कन्नड गुंडांची मर्जी राखण्यासाठी शहरातील दुकानांच्या फलकांना काळे फासले. पोलिसांनी म.ए.समितीचे युवा नेते शुभम शेळके यांना तब्बल पाच लाखांचा दंड ठोठावून अकलेचे तारे तोडले […]
समांतर क्रांती / चेतन लक्केबैलकर खानापूर तालुक्यात चोरट्यांनी अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. शेतीतील अवजारांपासून घरे फोडण्यापर्यंत आणि बसस्थानकावर प्रवाशांना लुटण्यापासून ते महामार्गावर वाटमारीपर्यंत चोरट्यांनी हैदोस मांडला असला तरी पोलिसांची कामगिरी मात्र अत्यंत सूमार आहे. नागरीक धास्तवाले असून पोलिसांच्या कार्यप्रणालीबद्दल संताप व्यक्त होत आहे. पंधरा दिवसांपूर्वी एकाच रात्री तब्बल दहा घरांत चोरी करून चोरट्यांनी तब्बल ४५ […]
समांतर क्रांती / खानापूर हेस्कॉमकडून देखभाल व दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने शुक्रवारी (दि. ३१) खानापूर तालुक्यातील काही गावांमध्ये दुपारी १ ते ५ यावेळेत वीजपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. खानापूर वीज केंद्रात अचानक दुरुस्तीचे काम निघाल्यामुळे खानापूर शहरासह लैला शुगर्स, देवलत्ती, बिदरभावी, भंडरगाळी, गर्लगुंजी, तोपिनकट्टी, भंडरगाळी निडगल, दोड्डहोसुर, सन्नहोसूर, करंबळ, जळगा, कुप्पटगिरी, लोकोळी, लक्केबैल, […]