समांतर क्रांती / जांबोटी तीस- चाळीस वर्षापासून या मंदीराचे काम करण्याचा संकल्प ग्रामस्थांनी सोडला होता, तो संकल्प पूर्ण झाल्याचे समाधान वाटते, असे प्रतिपादन माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी केले. हब्बनहट्टी येथील वाल्मिकी मंदिराचे फित कापून उद्घाटन केल्यानंतर डॉ. निंबाळकर बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्ष व्यंकू नाईक, स्वागताध्यक्ष नागोजी पाटील होते. कार्यक्रमाची सुरूवात दिप प्रज्वलन करून […]
समांतर क्रांती / खानापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी शनिवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातून सात अर्ज दाखल झाले आहेत. संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतलेल्या खानापूरच्या लढतीत दोन उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. आमदार विठ्ठल हलगेकर आणि आमदार चन्नराज हट्टीहोळ्ळी यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनविली होती. सुरूवातीला आ. हट्टीहोळ्ळी हे निवडणूक लढवतील […]
समांतर क्रांती / खानापूर नंदगड येथील खानापूर तालुका मार्केटींग सोसायटीच्या निवडणुकीत १३ पैकी १० संचालकांची अविरोध निवड करीत माजी आमदार अरविंद पाटील यांनी दिवाळीपूर्वीच विजयाचे फटाके फोडले. काल सोमवारी (ता. ६) अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी आकरा उमेदवारांनी माघार घेतली. तर उर्वरित तीन जागांसाठी सहाजण रिंगणात असून रविवारी (ता.१२) निवडणूक होणार आहे. मार्केटिंग सोसायटीवर गेल्या २५ […]
समांतर क्रांती / रामनगर बेळगाव–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील तीनईघाट (पालडा रस्ता क्रॉस) येथील पुलाखाली शनिवारी रात्री एका महिलेचा मृतदेह सापडला होता. नंदगड येथील अंगणवाडी शिक्षिका अश्विनी बाबुराव पाटील (वय ५०, रा. नंदगड) यांचा मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले होते. याप्रकरणी एकास रामनगर पोलिसांनी शंकर पाटील नामक रिक्षा चालकाला ताब्यात घेतले आहे. त्याची कसून चौकशी केली जात आहे. […]
समांतर क्रांती / खानापूर शिवस्मारकातील सभागृहात बोलाविण्यात आलेल्या महत्वपूर्ण बैठकीत आज गुरुवारी (ता. 25) काय निर्णय घेण्यात आला? याबाबत मराठी भाषिकात उत्सुकता आहे. बैठकीत सुरुवातीला विद्यार्थ्यांच्या सत्काराचा विषय चेर्चेला आला. यावेळी कार्यक्रमाचा खर्च कोण करणार यावरून बरीच खलबते झाली, पण निर्णय होऊ शकला नाही. यावेळी बोलताना माजी आमदार दिगंबर पाटील यांनी मराठा समाजाने जातीनिहाय जनगणतीत […]
समांतर क्रांती / विशेष खानापूरच्या बाझारपेठेत परप्रांतीयांची संख्या झपाट्याने वाढत असून स्थानिक व्यापारी संकटात सापडले आहेत. किराणा मालाच्या दुकानापासून ते केशकर्तनालयापर्यंत सर्वच ठिकाणी गुजराती लोकांनी बस्तान बसविले आहे. त्याशिवाय त्यांच्याकडून अतिक्रमण होत असल्याची भावना स्थानिकांत आहे. शहरातील रविवार पेठेत चार-पाच वर्षांपूर्वीपर्यंत स्थानिक लिंगायत, मुस्लिमआणि मराठा व्यापाऱ्यांचे वर्चस्व होते. तेथेही परप्रांतीय व्यापाऱ्यांनी जम बसविला आहे. तर […]
समांतर क्रांती / खानापूर भाजपने आज बुधवारी (ता. 24) सरकारकडून विकास कामात सहकार्य मिळत नसल्याच्या निषेधार्थ रस्तारोको केला. आमदार विठ्ठल हलगेकर यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. पण, त्यांच्यासमोर आता वेगळेच आव्हान उभे ठाकले आहे. दोन दिवसांपूर्वी आमदार विठ्ठल हलगेकर यांनी काँग्रेसच्या माजी आमदार तालुक्याच्या विकासात आडकाठी करीत असल्याचा आरोप केला होता. त्या आरोपाला प्रत्युत्तर देताना […]
समांतर क्रांती / खानापूर खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वाची बैठक गुरुवारी (ता. २५) दुपारी २ वाजता राजा शिवछत्रपती स्मारकात बोलावण्यात आली आहे. तरी म. ए. समितीचे पदाधिकारी आणि कार्यकारिणी सदस्यांनी वेळेत हजर रहावे, असे आवाहन समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई, माजी आमदार दिगंबर पाटील, कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील, निरंजन सरदेसाई, सरचिटणीस आबासाहेब दळवी यांनी केले आहे. […]
समांतर क्रांती / खानापूर इटगी येथे खासगी माध्यमिक शाळा आणि कॉलेज असल्याने मंजूर माध्यमिक शाळा गस्टोळीला सुरू करण्यासाठी आपणच पत्र दिल्याचे आमदार विठ्ठल हलगेकर यांनी मान्य केले. दरम्यान, इटगी येथील माध्यमिक विद्यालयाबरोबरच गस्टोळी येथे सुध्दा माध्यमिक शाळा सुरू करण्यासाठी माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी केलेल्या विशेष प्रयत्नांचे आम्ही स्वागत करतो, असे त्यांनी म्हटले आहे. […]
समांतर क्रांती / खानापूर माणिकवाडी येथील तरूणाच्या खून प्रकरणी पोलिसांकडून तपासात दिरंगाई होत असल्याची तक्रार मयत तरूणाचे आई-वडील आणि ग्रामस्थांनी अखिल भारतीय काँग्रेसच्या सचिव, माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांच्याकडे मांडली. यावेळी डॉ. निंबाळकर यांनी तात्काळ पोलिस निरीक्षक लालसाब गवंडी यांना बोलावून घेत त्यांच्याकडे तपासाबाबत चौकशी केली. यावेळी पोलिस निरीक्षकांनी तपास सुरू आहे. कांही तांत्रीक […]