समांतर क्रांती न्यूज खानापूर: रामनगर रस्त्याच्या दुर्दशेचे कवित्व सात वर्षानंतरही संपेनासे झाल्याने अव्वाच्या सव्वा बाता मारणाऱ्या राष्ट्रीय नेतृत्वाचे नाक कापले गेले तरी भोके अजून शिल्लक असल्याचा अनुभव या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना येत आहे. उन्हाळ्यात धूळीने माखणाऱ्या प्रवाशांना पावसाळा सुरू झाल्यानंतर चिखलातून वाट काढावी लागत आहे. अपघातामुळे वाहन चालक पुरते हैराण झाले आहेत. आमदार विठ्ठल हलगेकर […]
बेळगाव: जिल्हा शिवसेना प्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्या मुलाने लग्न झाल्याच्या अवघ्या महिनाभरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. प्रतीक प्रकाश शिरोळकर (वय 29), आर्किटेक्चर मूळ रा. कोनवाळ गल्ली, सध्या रा. गणेशपूर बेळगाव असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.याबाबतची सविस्तर माहिती अशी, महिन्याभरापूर्वीच प्रतिकचा विवाह झाला होता. घरातील सर्व मंडळी खोलीत असताना, अचानक […]
समांतर क्रांती न्यूज बंगालच्या उपसागरातील वारे सक्रिय झाले असून आजपासून (ता.२३) पाऊस बरसणार असल्याची आनंद वार्ता हवामान खात्याने दिली आहे. पर्जन्यवृष्टीला पूरक वातावरण तयार झाले अल्याने उद्यापासून (ता.२४) गोवा, कोकण किनारपट्टी तसेच मध्य महाराष्ट्रात जोरदार पर्जन्यवृष्टीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातही समाधानकारक पाऊस होईल, असे हवामान खात्याने म्हटले आहे. काल गुरूवारी कणकुंबी […]
बेळगाव: विश्वभारती कला क्रीडा फाउंडेशन मुलांना खेळापासून आवड व शारीरिक शिक्षणापासून वेगवेगळ्या फायद्यांचा प्राथमिक शाळेतील मुलांना कसा फायदा करता येईल यासाठी अहोरात प्रयत्न करत असते. त्याचाच एक भाग म्हणून आंतरराष्ट्रीय योग दिन दहा प्राथमिक शाळांमध्ये पतंजली योग विद्यापीठाच्या सहकार्याने साजरा करण्यात आला. बेळगाव येथील सावगाव व बेंकनहळी प्राथमिक शाळा व खानापूर तालुक्यातील हेबाळ गावाममध्ये विद्यार्थ्यांना […]
खानापूर तालुक्यातील पाच मराठी शाळा पटसंख्या कमी असल्याचे कारण दाखवून बंद करूनही शासनाचा कंडू शमलेला नाही. त्यानंतर आता एकशिक्षकी शाळांची जबाबदारी कानडी शिक्षकांवर सोपवून त्या शाळांचे कानडीकरण करण्याचा घाट शिक्षण खात्याने घातला आहे. तालुक्यातील घोसे बुद्रूक, सिंगिनकोप, गवसे,चिरेखाणी, सातनाळी, गंवेगाळी, बांदेकरवाडा, मेंडील या मराठी शाळांमधील कारभार यापुढे कानडी शिक्षक पाहणार आहेत. खरंतर या मराठी शाळांची […]
समांतर क्रांती विशेष बेळगाव ते धारवाड लोहमार्गासाठी नंदिहळ्ळी परिसरातील शेकडो एकर जमिनी संपादीत करण्याचा घाट घातला गेला आहे. त्याला शेतकर्यांनी तीव्र विरोध दर्शविला असून हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ठ आहे. उच्च न्यायालयाने शेतकर्यांना दिलासा दिला होता. पण, मनाईहुकुम उठल्यानंतर जमिन संपादीत करण्यासाठी हालचाली सुरू आहेत. एकीकडे शेतकर्यांचा विरोध आणि त्यासाठीची आंदोलने बळाचा वापर करून चिरडली जात […]
बेळगाव: मुलीचे लग्न आवघ्या सहा दिवसांवर असतांना वडिलांचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाल्याने गर्लगुंजी गावावर शोककळा पसरली आहे. अरूण मष्णू पाटील (वय ४५, रा.गर्लगुंजी) असे त्यांचे नाव असून गुरूवारी लग्नपत्रिका वाटून घरी परततांना त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने ठोकरल्याची घटना सुळगा येथे घडली. घरात लगिनघाई सुरू होती. लग्न अवघ्या सहा दिवसांवर येऊन ठेपल्याने अरूण हे नातेवाईकांना पत्रिका […]
बेळगाव: बेळगाव तालुक्यातील मारिहाळ येथे एका तरूणावर धारदार शस्त्राने सपासप वार करून खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. महांतेश रुद्राप्पा कर्लिंगन्नावर (वय २३, रा.मारिहाळ) असे या तरूणाचे नाव असून चार-पाच जणांच्या टोळक्याने त्याची हत्या केल्याचे समोर आले आहे. पूर्ववैमनस्यातून ही घटना घडली असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. मारिहाळ पोलिसात घटनेची नोंद झाली असून अधिक तपास […]
आकरा जागांवर विजय; भाजपला धक्का बेळगाव: काँग्रेसने पुन्हा भाजपचा उधळलेला सत्तावारू राखत संपूर्ण राज्यात भाजपचा धुव्वा उडविला. बेळगाव जिल्ह्यातदेखील १८ पैकी ११ जागांवर काँग्रेसने दणदणीत विजय मिलविला. मागील विधानसभा निवडणुकीत बेळगाव जिल्ह्यातील १८ पैकी १३ जागांवर भाजपने वर्चस्व मिळविले होते. ऑपरेशन कमळच्या वेळी आणखी तीन आमदारांनी भाजपचा रस्ता गाठला होता. त्यामुळे काँग्रेसकडे केवळ पाच आमदार […]
अंदाज अपना अपना.. समितीचा प्रचारातील धडाका पाहता यावेळी बेळगाव दक्षिण आणि ग्रामीण मतदारसंघात भगवा फडकणार हे निश्चित आहे. तर बेळगाव उत्तर, खानापूर आणि यमकनमर्डी मतदारसंघात समितीला पराभव सहन करावा लागू शकतो.बेळगाव: मतमोजणीचा काऊंट डाऊन आता काही वेळातच सुरू होणार असून बेळगाव आणि खानापुरातून समितीचा भगवा किती जागांवर फडकणार? याकडे मराठी भाषिकांचे लक्ष लागले आहे. कर्नाटकात […]