समांतर क्रांती / बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणुकीचे रान पेटले असून अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. काल सोमवारी (ता.९) सकाळी माजी खासदार रमेश कत्ती यांनी अपहरण केलेल्या कृषीपत्तीन संचालकांची सुटका झाल्याची घटना घडली होती. दरम्यान, दुपारी अथणी तालुक्यातील मदहळ्ळी येथे कृषीपत्तीनच्या संचालकाच्या पत्नीने पतीला चक्क पालकमंत्री सतिश जारकीहोळ्ळी यांच्यासमोरच थोबाडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. […]
समांतर क्रांती / संडे स्पेशल सीमावासीय मराठी भाषीकांना डिवचण्यासाठी आटापीटा करून उभारण्यात आलेल्या हलगा येथील सुवर्णसौधचे वीजबिल भरण्यास सरकार असमर्थ असल्याचे स्पष्ट झाले आहे. तब्बल १.१० कोटींचे सुवर्णसौधचे वीजबिल थकले असून हेस्कॉमने सार्वजनिक बांधकाम खात्याला नोटीस पाठवून वीज पुरवठा खंडीत करण्याचा इशारा दिला आहे. बेळगावच्या मराठी भागावर हक्क सांगण्यासाठी कर्नाटक सरकारने हलगा येथे रू. ३९४ […]
समांतर क्रांती / खानापूर गणेश विसर्जनावेळी पाण्यात बुडून मृत्यू झाल्याच्या दोन घटना शनिवारी (ता.६) घडल्या. एका घटनेत यडोगा येथील तरूण शुभम यल्लाप्पा कुप्पटगिरी (वय २२) हा मलप्रभेत बुडाला, तर दुसऱ्या घटनेत बेळगाव शहरातील जक्कीनहोंडा तलावात बुडून राहूल बेकवाडकर (३३, रा. वड्डरवाडी) याचा मृत्यू झाला. या घटनांमुळे हळहळ व्यक्त होत आहे. याबाबतची अधिक माहिती अशी, गणेश […]
समांतर क्रांती / कारवार एका महिला पत्रकारांशी उध्दट वर्तणुकीनंतर कर्नाटकचे प्रशासन सुधारणा आयोगाचे अध्यक्ष, आमदार आर. व्ही. देशपांडे अडचणीत आले आहेत. उत्तर कन्नड जिल्ह्यात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल का नाही? असा प्रश्न सदर महिला पत्रकाराने विचारला असता, तुमचे बाळंतपण करायचे आहे का? असा अपमानकारक सवाल करून देशपांडे यांनी राळ ओढवून घेतली आहे. त्यांच्या या वक्तव्याचा सर्वच […]
कारवार: शुक्रवारी रात्री उशिरा येल्लापूरमधील मावल्ली क्रॉसजवळ झालेल्या अपघातात केएसआरटीसी बस रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या लॉरीला धडकली, त्यात तीन जण जागीच ठार झाले तर सात जण गंभीर जखमी झाले. मृतांची ओळख पटली आहे. बागलकोट येथील निलव्वा हरदोल्ली (४०) आणि जालिहाळ गावातील गिरिजव्वा बुडन्नावर (३०) अशी त्यांची नावे आहेत. आणखी एका मृताची ओळख अद्याप पटलेली नाही. […]
समांतर क्रांती / दांडेली दांडेली शहरातील अलाइड एरियामधील कपडे धुण्याच्या ठिकाणी मगर आढळल्याने काही काळ घबराट पसरली होती. वन कर्मचाऱ्यांनी मगरीला पुन्हा पाण्यात सोडल्याने नागरीकांनी नि:श्वास सोडला. आज दुपारी १२ वाजता हल्याळ रस्त्यावरील अलाइड एरियामधील कपडे धुण्याच्या ठिकाणी १० ते १२ फूट लांबीचा मगर आढळून आल्याने काही काळ घबराट निर्माण झाली. तिथल्या स्थानिकांनी लगेचच वन […]
समांतर क्रांती / बेळगाव कोल्ड्रीकच्या बाटलीतील झुरळ मारण्याचे औषध पिल्याने अडीच वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना बेळगावातील आझमनगरात घडली आहे. मरीयम अकिलअहमद तल्लूर असे या दुर्दैवी चिमुकलीचे नाव असून या घटनेत जुनेशा नामक मुलगी अत्यव्यस्थ आहे. तिच्यावर उपचार सुरू आहेत. मरीयम ही शेजाऱ्यांच्या घरात खेळण्यासाठी गेली होती. ती जुनेशासोबत खेळत असतांना त्यांना कोल्ड्रीकची बाटली दिसली. […]
समांतर क्रांती / कारवार ED raids Congress MLA’s house कारवार येथील काँग्रेस आमदार सतीश शैल यांच्या घरावर आज बुधवारी (ता.१३) सकाळी ईडीच्या २४ हून अधिक अधिकाऱ्यांनी छापा टाकला. मल्लिकार्जुन शिपिंग कंपनीच्या बेकायदेशीर खनिज वाहतूक प्रकरणासंदर्भात ईडी अधिकाऱ्यांनी ही कारवाई केल्याचे कळते. माजी लोकायुक्त न्यायमूर्ती संतीश हेगडे यांच्या तक्रारीनंतर हा छापा टाकण्यात आला आहे. बेकायदेशीर खनिज […]
Minister Lakshmi Hebbalkar’s name misused; Many people in Khanapur were robbed by luring them with jobs. समांतर क्रांती / बेळगाव राज्याच्या महिला आणि बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या नावाचा वापर करून अनेकांना लुटण्यात आल्याचा गौप्यस्फोट खानापुरातील सामाजिक कार्यकर्ते जयंत तिनेकर यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. नोकरीचे आमिष दाखवून मंत्र्यांच्या जवळच्या माणसाने काव्या यळ्ळूर या […]
समांतर क्रांती / बेळगाव कन्नडसक्तीविरोधात आज सोमवारी (ता.११) जिल्हाधिकारी महमद रोशन यांना मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने निवेदन सादर करण्यात आले. मोर्चा न काढण्याची विनंती पोलिस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी केली होती. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमून निवेदन सादर करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी आणि पोलिस आयुक्तांनी अश्वासक भूमिका घेत मराठी भाषीकांच्या हक्क आणि अधिकारांवर गदा येणार […]