समांतर क्रांती / जोयडा रेल्वेच्या धडकेत नऊ वर्षे वयाच्या बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना कारवारजवळील थोडुरू येथे घडली. मालगाडीने धडक दिल्याने ही घटना घडल्याचे वनक्षेत्रपाल गजानन नायक यांनी सांगितले. रात्रीच्या वेळी ही घटना घडली. वनधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. उत्तरीय तपासणीनंतर मृत बिबट्याचे कलेवर दफन करण्यात आले. या घटनेबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.
समांतर क्रांती / रामनगर रामनगर येथील जवान शशिकांत गोसावी (वय ४५) यांचे पंजाब – पठाणकोट येथे निधन झाले होते. त्यांना आज गुरूवारी (ता.३१) शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी रामनगर पंचक्रोशीतील नागरीकांनी सकाळी रामनगरात अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती. प्रसंगी त्यांच्या जयघोषाने परिसर दणाणून गेला होता. जवान शशिकांत गोसावी हे गेली २४ वर्षे भारतीय सेनेत […]
समांतर क्रांती / लोंढा अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी वनाधिकाऱ्याला अटक करून कारागृहात रवानगी करण्यात आल्याची घटना रामनगर येथे घडली आहे. लिंगप्पा लमाणी (वय ४५, रा. विजयपूर) असे या वनाधिकाऱ्याचे नाव आहे. Forest officer arrested for abusing minor, sexually assaulting minor. याबाबतची अधिक माहिती अशी, पिडीत मुलगा नेहमीच्या कामाच्या ठिकाणी जात असतांना कुंबेली तपासणी नाक्यावरील […]
समांतर क्रांती / बेळगाव Students’ lives in danger: Two poisoning incidents in ten days. माध्यान्ह आहार प्रक्रियेतील हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला आहे. गेल्या दहा दिवसांत जिल्ह्यात दोन शाळांमध्ये विषबाधेच्या घटना घडल्या आहेत. तरीही शिक्षण खात्याकडून दक्षता घेतली जात नसल्याने ही बाब गंभीर बनत चालली आहे. सौंदत्ती तालुक्यातील हुलकट्टी येथील प्राथमिक शाळेत पाण्यातून विषबाधा झाल्याने […]
समांतर क्रांती / अंकोला The incident of a private bus leaving from Belgaum falling into a river took place early in the morning near Agsur in Ankola taluka. बेळगावहून निघालेली खासगी बस नदीत कोसळल्याची घटना पहाटेच्या सुमारास नदीत कोसळल्याची घटना अंकोला तालुक्यातील अगसूरजवळ घडली. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून १८ प्रवासी जखमी झाले आहेत. […]
समांतर क्रांती / कारवार Former MP Anantkumar Hegde receives death threat कारवार लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार अनंतकुमार हेगडे यांना अज्ञात व्यक्तिने जीवे मारण्याची धमकी दिली आहे. यासंदर्भात शिरसी पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे. नेहमीच वादाच्या भोवऱ्यात असणारे माजी केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांना १८ जून रोजी अज्ञाताने ई-मेल करून जीवे […]
समांतर क्रांती / गोकर्ण Gokarna: Child died nine months ago; Russian woman reveals shocking information रशियन महिला नीना कुटीना उर्फ मोही हीने काल ए.एन.आय.शी संवाद साधला. यावेळी तिने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. त्यात तिने नऊ महिन्यांपूर्वी तिच्या मोठ्या मुलाचा मृत्यू झाल्याचे सांगितले. अस्थी पोलिसांनी नेल्या असल्याचेही तिने नमुद केले आहे. पण, तिने त्या मुलाचा […]
समांतर क्रांती / रामनगर Luckily survived a bear attack, walked four km and reached home जोयडा तालुक्यातील रामनगर येथील मारुती माळेकर (४९) या शेतकऱ्यावर मंगळवारी (ता.१५) संध्याकाळी अस्वलाने हल्ला करून गंभीर जखमी केले. शेतातून घरी येताना अस्वलाने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. त्यात ते जखमी झाले. अस्वलाच्या तावडीतून सुटण्यासाठी त्यांनी आरडाओरडा केली. मात्र ,अस्वलाने त्यांच्या डोक्यावर […]
समांतर क्रांती / खानापूर खानापूरसह रामनगर पोलिस स्थानकात १६ हून अधिक गुन्हे दाखल असलेला गुंड प्रविण सुधीर (रा. रामनगर) याच्यावर सोमवारी पोलिसांनी गोळीबार केला. त्यात तो जखमी झाला आहे. तसेच यल्लापूर पोलिस स्थानकाचे सहायक पोलिस निरीक्षक व तीन पोलिस कर्मचारी सुध्दा या घटनेत जखमी झाले आहेत. याबाबतची अधिक माहिती अशी, रामनगर येथील गुंड प्रविण सुधीर […]
समांतर क्रांती / बेळगाव शाळेतील पाण्याच्या टाकीत अज्ञातांनी किटकनाशक टाकल्याची घटना सौंदत्ती तालुक्यातील हुलीकट्टी गावात ही घडली आहे. किटकनाशक मिश्रीत पाणी पिल्याने १२ विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने परिसरात खळबळ माजली आहे. आज सोमवारी (ता.१४) हुल्लीकट्टी शाळेत पाणी प्यालेल्या १२ विद्यार्थ्यांना चक्कर आणि उलट्या व्हायला सुरूवात झाल्याने तात्काळ त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. […]