समांतर क्रांती वृत्त / खानापूर कोयत्याचा धाक दाखवून अल्पवयीन मुलाला जबर मारहाण करण्यात आल्याचा व्हीडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर तब्बल २० दिवसांनी पोलिसांत तक्रार दाखल झाली आहे. सदर घटना रामनगर (ता. जोयडा) येथे घडली असून पोलिस काय कारवाई करणार? याकडे पालकांसह नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. रामनगर येथील एका अल्पवयीन मुलाला कोयत्याचा धाक दाखवून मारहाण […]
समांतर क्रांती / गोकर्ण गोकर्ण येथील रामतिर्थ डोंगरातील एका गुहेत रशियन ४० वर्षीय महिला आणि तिच्या दोन मुली आढळल्या आहेत. दरम्यान, घनदाट जंगलातील या गुहेत त्या कशा जिवंत राहिल्या? त्या काय खाऊन जगत होत्या? कशा राहत होत्या? ती महिला गुहेत राहून नक्की काय करीत होती? असे अनेक प्रश्नांनी सर्वसामान्यांना हैराण करून सोडले आहे. शुक्रवारी […]
रविवार विशेष / चेतन लक्केबैलकर बेळगाव आणि संपूर्ण सीमाभागावर कर्नाटक सरकारकडून केली जाणारी कन्नडसक्ती ही आजकालची नसून तिला ५२ वर्षांचा काळा इतिहास आहे. २२ जुलै १९७३ पासून कन्नडसक्तीला सुरूवात झाली. १९८६ च्या कन्नडसक्ती विरोधी आंदोलनात नऊ जणांनी हौतात्म्य पत्करले. शेकडो मराठी भाषिक जायबंदी झाले, तर हजारो सत्याग्रहींनी संसारावर तुळशीपात्र ठेवून तुरूगवास भोगला. तरीही मराठी माणसाने […]
समांतर क्रांती वृत्त / बेळगाव एकाच कुटुंबातील तिघांच्या आत्महत्येने खळबळ उडवून दिलेल्या प्रकरणात गुरूवारी (ता.१०) तिघांना अटक करण्यात आली आहे. राजेश कुरतडकर, भास्कर सोनारकर आणि नानासो शिंदे अशी संशयीतांची नावे असून त्यांच्याकडून ६०० ग्रॅम सोन्यासह चार लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. काल बुधवारी (ता.९) खासबाग – जोशी मळ्यातील संतोष कुर्डेकर याच्यासह त्याची आई आणि […]
समांतर क्रांती वृत्त: बेळगाव मंडोळी येथील काजू फॅक्टरीतून २ हजार ४४९ किलो काजूची चोरी केल्याप्रकरणी खानापूर तालुक्यातील उचवडे येथील तरूण महादेव तुकाराम पाटील (वय ३०) याला बेळगाव ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून ४२ पोती काजू आणि ट्रक (केए २२ सी ९३८७) यासह इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. पाच दिवसांपूर्वी (ता.५) मंडोळी येथील बाळासाहेब […]
समांतर क्रांती न्यूज एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यातील तिघांचा मृत्यू झाला तर एक महिला बचावली असली तरी तिची प्रकृती चिंताजनक आहे. या आत्महत्या प्रकरणात ‘सुसाईड नोट’ पोलिसांना आढळली आहे. चिटफंड व्यवहारातून मानसिक त्रास होत असल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे स्पष्ट झाले आहे. बेळगाव- खासबाग जोशी मळ्यातील संतोष कुराडेकर याने चिटफंडात अनेकांना […]
समांतर क्रांती / Breaking एकाच कुटुंबातील तिघांनी विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. तर या घटनेत अन्य एक मुलीची प्रकृती गंभीर आहे. बेळगाव शहरातील जोशी मळ्यात आज (ता.९) सकाळी उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. शहापूर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपास चालविला असून अद्याप कारण अस्पष्ट आहे. खासबाग जोशी मळ्यात एकाच कुटुंबातील तिघांनी विष प्राशन […]
समांतर क्रांती / रामनगर रामनगर पोलिसांनी सोमवारी (ता.८) सायंकाळी धक्कादायक प्रकार उघडकीस आणला असून तब्बल १९३० किलो इतके सुमारे ६ लाख ७५ हजारांचे गोमांस जप्त केले आहे. विशेष म्हणजे या प्रकरणातील मुख्य सुत्रधार अमोल मोहनदास हा असून त्याचा शोध घेतला जात आहे. तर गोमांस वाहतूक करणाऱ्या वाहनाचा चालक सिध्दाप्पा बाळाप्पा बहाद्दूर व क्लिनर राजू बाळू […]
समांतर क्रांती / नंदगड पुणे-बंगळूर महामार्गावरील विचित्र अपघातात नंदगड येथील ३० वर्षीय तरूण ठार झाल्याची घटना काल रविवारी (ता.६) घडली. रफिक बशिरअहमद जांबोटी (वय ३०, रा. नंदगड) असे मयताचे नाव असून तो महामार्गावरील दोन ट्रकचा अपघात पाहत असतांना त्याच्यासह अन्य एका दुचाकीस्वारावर काळाने घाला घातला. या अपघातात शिवाप्पा चंबाप्पा शहापूर (६३, रा. हुबळी) हा दुचाकीस्वार […]
समांतर क्रांती / बेळगाव भाजपचे खासदार इराण्णा कडाडी यांनी सीमाप्रश्नावर बेताल वक्तव्य करीत अकलेचे तारे तोडले आहेत. त्यांनी सीमाप्रश्न हा संपलेला विषय आहे, अससे म्हणत नव्या वादाला तोंड फोडले असून त्यांचा मराठी भाषिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, त्यांच्या या वक्तव्याचा शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी चांगलाच समाचार घेत ‘जोपर्यंत मराठी माणूस सीमाभागात […]