चेतन लक्केबैलकर आश्वासनांची खैरात करून जनसामान्यांना गुंतवून ठेवण्याचा चंग बांधून आगामी निवडणुकीत इस्पित साध्य करून घेण्याचा ध्यास तालुक्यातील इच्छूक उमेदवारांनी घेतला आहे. त्यात म.ए.समितीचे नेते, काँग्रेसच्या सर्वेसर्वा आमदार डॉ. अंजली निंबाळकर आणि तालुक्याच्या विकासाचा महामेरू पेलत असल्याचा अभास निर्माण करणाऱ्या भाजपच्या नेत्यांसह ‘भायल्यां’चाही समावेश आहे. मात्र, त्यांच्या या आश्वासनांमुळे सर्वसामान्यांचे जीव कवडीमोल झाले आहेत. तालुक्यातील […]
खानापूर: दोन गटात विभागलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीत एकी साधण्यात मध्यवर्ती म.ए.समितीच्या नेत्यांना अखेर यश आले आहे. सीमाप्रश्नाची सोडवणूक आणि आगामी विधानसभा निवणुकीत मराठी भाषिकांची लोकेच्छा प्रदर्शित करण्यासाठी दोन्ही गटांनी एकत्र येण्याच्या केलेल्या आव्हानाला तालुक्यातील मराठी भाषिकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. येथील शिवस्मारकात झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत आठ सदस्यीय समिती गठीत करण्यात आली आहे. एकंदर,एकीची प्रक्रिया विनासायास सुरू […]
खानापूर: गोपाळ देसाई यांच्या गटाने वाकडी वाट करीत बुडाखाली शेपूट घातल्यामुळे एकीचा प्रयत्न पुन्हा बारगळला. माजी आमदार दिगंबर पाटील यांच्या गटातील नेत्यांनी मनाचा मोठेपणा दाखवित गोपाळ देसाई गटाच्या आंदोलनस्थळी जाऊन मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी गर्लगुंजी येथील माऊली ग्रूपने महत्वाची भूमिका बजावली. पण, त्यांच्याही आपेक्षांवर विरजन पडले. किमान काळ्यादिनी तरी दोन्ही समित्या एकीची संधी साधतील, […]