
समांतर क्रांती / खानापूर
मारहाणीत गंभीर जखमी झाल्याने माणिकवाडी येथील तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (ता.३) घडली होती. वंकटेश मल्हारी मयेकर (१८) असे या दुर्दैवी तरूणाचे नाव असून तो रुमेवाडी नाक्यावरील लॉजमध्ये वेटर म्हणून काम करीत होता. तो आई-वडिलांसाठी एकुलता होता. त्यामुळे त्याच्या अशा मृत्यूबद्दल माणिकवाडी आनि परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला लॉज मालक नागराज गुंडू बेडरे व त्याचा भाऊ विजय गुंडू बेडरे यांच्यावर खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे. हे दोघेही गुंड प्रवृत्तीचे असून नागराज यांने पोक्सो गुन्ह्यात तुरूंगाची हवा खाली आहे. नुकताच तो जामिनावर सुटला होता.
वेंकटेश हा गेल्या कांही महिन्यांपासून बेडरे यांच्या लॉजमध्ये कामाला होता. १६ ऑगस्ट रोजी नागराज आणि विजय यांनी त्याच्यावरर चोरीचा आळ घेत त्याला आधी लॉजमध्ये आणि नंतर त्याच्या माणिकवाडी येथील घरी नेऊन बेदम मारहाण केली. त्यात तो गंभीर जखमी झाला. दुसऱ्या दिवशी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हा नागराज याने उपचारासाठी दहा हजार देऊन मारहाणीची वाच्यता करू नका, अन्यथा तुम्हाला जीवे मारू, अशी धमकी वेंकटेश याच्या आई-वडिलांना दिली होती.
खासगी रुग्णालयात उपचार शक्य नसल्याने त्याला बिम्समध्ये दाखल करण्यात आले होते. पण, उपचारांचा उपयोग न झाल्याने बुधवारी रात्री त्याचा मृत्यू झाला. खानापूर पोलिसांनी याप्रकरणी नागराज आणि विजय यांच्यावर खुनाचा गुन्हा नोंदविला असून अधिक तपास सुरू आहे.
संशयीत आरोपी गुंड प्रवृत्तीचे..
या प्रकरणातील नागराज व विजय बेडरे हे दोघेही संशयीत आरोपी गुंड प्रवृत्तीचे आहेत. नागराज याच्यावर अलिकडेच पोक्सोअंतर्गत गुन्हा नोंद झाला होता. त्यात त्याला कारागृहाची हवा खावी लागली होती. नुकताच त्याची जामिनावर सुटका झाली होती. त्यानंतर त्याने पुन्हा गुंडगिरीला सुरूवात केली. त्यात वेंकटेश याचा निष्पाप बळी गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी आपेक्षा व्यक्त होत आहे.


खानापूर गणेश दर्शन २०२५
खानापूर: विद्यानगर- रल्वेस्टेशन रोड येथील सिध्दीविनायक गणेशोत्सव मंडळाचा हलता देखावा आणि श्रीमूर्ती शिवस्मारक चौकातील जिजाऊ युवक मंडळाची सुबक गणेश मूर्ती स्टेशन रोड येथील महाराष्ट्र तरूण मंडळाची गणेश मूर्ती बुरूड गल्लीतील तरूण मंडळाची विठ्ठल-रखुमाई देखावा आणि श्रीमूर्ती निंगापूर गल्लीतील सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाची झोपाळ्यावर विराजमान गणेशमूर्ती देसाई गल्ली बाल गणेश मंडळाची सुबक गणेश मूर्ती रविवार पेठेतील […]