समांतर क्रांती / ब्युरो न्यूज
सणासुदीच्या दिवसात नारळाची आवक वाढली असतांनाच दरही गगणाला भिडले आहेत. नारळाचे दर ५० रूपये झाला असून पहिल्यांदाच परराज्यातून नारळांची आयात करावी लागत आहे.छोटे नारळ सुध्दा ३५ ते ४० रुपयांना खरेदी करावे लागत आहेत.
गोवा आणि कोकणात सुध्दा नारळाचे उत्पादन ६० टक्क्यांनी घटले आहे. या पार्श्वभूमीवर नारळांचे दर वाढले आहेत. सध्या आध्रप्रदेशातील पालकोल आणि मद्रास नारळासह तामिळनाडूतून नारळाची आयात केली जात आहे.
कर्नाटकातील सापसोल नारळाच्या उत्पादनात कमालीची घट झाल्याने आगामी काळात नारळाचे दर आणखी भडकण्याची शक्यता आहे. तसेच सुके खोबरे आणि खोबरेल तेलाचे दरही चढेच राहणार आहेत.

चाकूने सपासप वार करून महिलेचा खून
समांतर क्रांती / बेळगाव चाकूने सपासप वार करून महिलेचा खून करण्यात आल्याची घटना टिळकवाडीतील मंगळवार पेठेत आज बुधवारी (ता.१०) सकाळी आठच्या सुमारास घडली. गिता रणजीत गवळी (५५) असे या महिलेचे नाव असून या प्रकरणी तिचा दीर गणेश गवळी याला ताब्यात घेतले आहे. सदर खून मालमत्तेच्या वादातून झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मृतदेह शवचिकीत्सेसाठी सिव्हील इस्पितळात पाठविण्यात […]