समांतर क्रांती / बेळगाव
मुलीच्या लग्नासाठी घेतलेले कर्ज फेडता न आल्याने बापाने टोकाचे पाऊल उचलले. बँक, पतसंस्था आणि कर्ज देणाऱ्यांचा त्रास असह्य झाल्याने बापाने जीवन संपविल्याची घटना आज बुधवारी (ता. १०) बेळगावात घडली. या घटनेने कंग्राळी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दुपारी किल्ला तलावात मृतदेह तरंगताना दिसला. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून पाहिल्यानंतर त्याच्या खिशात सापडलेल्या वाहन परवान्यावरून त्याची ओळख पटली. बेलगाव तालुक्यातील बी.के. कंग्राळी येथील किरण मनगुत्तकर (५४) आत्महत्या केलेला रिक्षाचालक आहे. वर्षभरापूर्वी मुलीचे लग्न करून दिलेला किरण मागील चार–पाच दिवसांपासून घरी गेला नव्हता. त्याने ऑटो स्टँडवर रिक्षा उभा करून तलावात उडी मारून आत्महत्या केली. ही घटना मार्केट पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.
घटनेची माहिती मिळताच मार्केट पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृतदेह तलावाबाहेर काढल्यानंतर कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला.

गवाळी परिसरातील जमिनींवर भू-माफीयांचा डोळा; नागरीकांची दिशाभूल
समांतर क्रांती / खानापूर गावाचे स्थलांतर होणार असल्याचे सांगून एका भू माफीयाने भीमगड अभयारण्यातील शेतजमिनी लाटण्याचा प्रयत्न चालविला आहे. याच भू माफीयाने कांही वर्षांपूर्वी या परिसरात खाणकाम सुरू केले होते. आता पुन्हा त्यांने नागरीकांची दिशाभूल चालविल्याची चर्चा असून यामध्ये तहसील कार्यालयातील अधिकारीदेखील गुंतले आहेत. भीमगड अभयारण्यातील १३ गावांच्या स्थलांतराचा प्रयत्न सुरू आहे. १५ लाखांच्या बदल्यात […]