
समांतर क्रांती / खानापूर
काल दुपारी चापगाव परिसरात चोरटे असल्याचे पोलिसांना समजले होते. त्यानंतर रात्री चापगावातील फोंडेश्वर मंदिरात चोरी झाली. मंदिरातील सुमारे १०.३० लाखाचे चांदीचे मुकुट चोरट्यांनी लांबविल्याने खळबळ उडाली आहे.
चोरट्यांनी शनिवारी रात्री चापगाव येथील फोंडेश्वर मंदिराचा समोरच्या दरवाजाचे कुलुप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर खिडकीतून गाभाऱ्यात प्रवेश करून मुकुट लांबविले. अलिकडेच महाशिवरात्रीला मुकुट चढविण्यात आले होते. ही घटना समजताच गावकऱ्यांनी मंदिरासमोर गर्दी केली. पोलिसांना कळविण्यात आल्यानंतर ठसेतज्ञ आणि श्वानपथकाला पाचारण करून तपास करण्यात आला. नंदगड पोलिसात घटनेची नोंद झाली आहे.
चोरट्यांचा माग लागुनही चोरी कशी झाली?
चार दिवसांपूर्वी बैलूर येथील एका घरात चोरी करतांना एक चोरट्याला गावकऱ्यांनी रंगेहात पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले होते. मात्र दोघे चोर फरार झाले होते. पोलिसांना मिळालेल्या चोरट्यांकडून त्यांचे मोबाईल क्रमांक त्यांचा शोध घेतला जात असता काल दुपारी चोरटे चापगाव परिसरात ‘स्पॉट’ झाले होते. त्यानंतर त्यांना जेरबंद करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तर मग चोरी कुणी केली, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
जे चोरटे सापडले ते चोरी झाली, त्यावेळी पोलिसांच्या ताब्यात होते, असे सांगितले जात असल्याने चापगावात चोरी करणारी टोळी वेगळी असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, काल जेरबंद करण्यात आलेल्या चोरट्यांनी तालुक्यात अनेक गावात चोरी केल्याचे कबुल केले असून ते तिघेही तालुक्यातील आहेत. चापगाव प्रकरणी नंदगड पोलिस अधिक तपास करीत आहेत.

वाढदिवसानिमित्त मणतुर्गा शाळेला प्रिंटर भेट
समांतर क्रांती / खानापूर मुलगा सार्थक याच्या ६ व्या वाढदिवसानिमित्त शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष ईश्वर बोबाटे यांनी शाळेला प्रिंटर भेट दिले. दरवर्षी सार्थकच्या वाढदिवसानिमित्त ते अभिनव उपक्रम करतात. यंदा त्यांनी आपल्याच शाळेला प्रिंटरची भेट देऊन त्यांनी त्यांच्या उपक्रम कायम ठेवला आहे. शाळा सुधारणा समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी शाळेच्या नुतनीकरणासाठी प्रयत्न चालविले आहेत. सार्थकचा वाढदिवस […]