
समांतर क्रांती / चेतन लक्केबैलकर
विजापूर जिल्ह्यातील चडचण तालुक्यातील निंबरगी ग्राम पंचायतीचे अध्यक्ष भीमगौडा बिरादार (४५) यांचा दिवसाढवळ्या गोळ्या झाडून खून करण्यात आल्याची घटना दोन दिवसांपूर्वी घडली. त्यानंतर महाराष्ट्र – कर्नाटक हद्दीवरील चडचण टोळ्या सक्रीय झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. एकेकाळी भीमातीर काठ हादरवून सोडलेल्या ‘चडचण’ टोळ्यांच्या रक्तरंजीत इतिहासाची आठवण यानिमित्ताने ताजी झाली आहे.
२०१७ साली धर्मराज चडचण पोलिस चकमकीत ठार झाल्यानंतर चडचण टोळ्याच्या कारवाया मंदावल्या होत्या. पण, पुन्हा गोळीबाराच्या घटनेने भीमातीर हादरला आहे. यामुळे केवळ नागरीकांतच नव्हे तर पोलिस खात्यातही दहशत पसरली असून पुन्हा चडचण टोळी सक्रीय झाल्यास गुन्हेगारीत वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
१९९० च्या दशकात होती दहशत
१९९० च्या दशकात चडचण टोळ्यांनी अक्षरश: पोलिस खात्याची झोप उडविली होती. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील पोलिस अधिकारी या टोळ्यांच्या दहशतीमुळे शस्त्र सोबत घेतल्याशिवाय घरातून बाहेर पडत नसत इतकी प्रचंड दहशत या टोळ्यांनी निर्माण केली होती. या टोळ्यांपैकी श्रीशैल चडचण टोळीने अनेकांचे मुडदे पाडले. बापाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी श्रीशैल याने सुरू केलेला गुन्हेगारी प्रवास त्याच्या तिन पिंढ्यांच्या उच्चाटनापर्यंत सुरू राहिला.
असा झाला चडचण टोळीचा उदयास्त..
मुळचे इंडी तालुक्यातील व्हळी उमराणीचा श्रीशैल चडचण याच्या वडीलाचा त्या गावातील सावकार पुत्राप्पा भैंरगोड यांने खून केला. त्याचा बदला घ्यायचा म्हणून श्रीशैलने गुन्हेगारीचा मार्ग स्विकारला होता. सिमाभातील तत्कालीन डॉन चंदाप्पा हरिजन यांच्या टोळीपासून श्रीशैलचा प्रवास स्वत:ची टोळी करण्यापर्यंत आला होता. बदल्याची आग श्रीशैला गप्प बसू देत नव्हती. त्यातून व्हळी उमराणीतील सावकार भैंरगोड यांच्या वाड्यावर हल्ला केला. त्यात एकाचवेळी आठजण ठार झाले. मात्र पुत्राप्पा भैंरगोड बचावला. या घटनेने त्यावेळी कर्नाटक आणि महाराष्ट्र मुळापासून हादरले होते. त्यांनतर श्रीशैल टोळीच्या कारवाया वाढल्या होत्या.
..आणि एन्कांटर झाला!

जत तालुक्यातील जाडुरबोबलाद येथील एका व्यापाऱ्यांची ट्रक चोरीचा त्याच्यावर आरोप होता. शिवाय खंडणी, खून, दरोडे, अपहरण, शस्त्रतस्करी असे अनेक गुन्हे श्रीशैलवर दाखल होते.महाराष्ट्र-कर्नाटक पोलिसांनी खिंडीत पकडून श्रीशैल चडचणचा 1997 ला बारामतीजवळ पाठलाग करून त्याचा एन्काऊंटर केला होता. पुढे चडचण टोळीची सुत्रे त्याचा साथीदार अंबाजी यांने ताब्यात घेतली. अंबाजी व त्याच्या साथीदाराचा कर्नाटक पोलिसांनी एन्काऊंटर केला. श्रीशैल मुत्यूनंतरही पुत्राप्पा भैंरगोड यांचा सूड घेण्याची धग श्रीशैलच्या पुतण्यापर्यंत कायम होती. त्यांतून पुतण्या शांताप्पाचा भैंरगोड टोळीने खातमा केला. पुढे धर्मराजने टोळीची सुत्रे हाती घेतली होती.
दहशत कायम..
चडचण टोळीची पुणे व कर्नाटकातील सिमावर्ती कोकणगावसह अनेक गावात मालमत्ता आहे. मल्लिकार्जून चडचण सध्या पुणे येथे वास्तव्यास असल्याचे वृत्त आहे. एंकदरीत बदल्याच्या आगीने तीन पिढ्याचा शेवट धर्मराजच्या एन्कांऊटरमुळे झाला. आता पुन्हा बोळीबाराच्या घटनेमुळे चडचणमधील टोळ्या सक्रीय झाल्याच्या चर्चांना ऊत आला आहे. भीमातीर काठावरील रक्तरंजीत काळ्या इतिहासाची आठवण या निमित्ताने आळविली जात आहे.


खानापूर: कुणाला मिळाले आदर्श शिक्षक पुरस्कार; खात्याकडून ३० जणांची यादी जाहिर
समांतर क्रांती / खानापूर येथील क्षेत्रशिक्षणाधिकाऱ्यांनी ३० आदर्श शिक्षकांची यादी आज शिक्षक दिनी सायंकाळी जाहीर केली. त्यामध्ये मराठी, कन्नड आणि उर्दू माध्यमांच्या शिक्षकांचा समावेश आहे. या सर्व आदर्श शिक्षकांचा सत्कार उद्या शनिवारी (ता.६) येथील शनया पाल्ममध्ये होणाऱ्या शिक्षक दिनाच्या कार्यक्रमात होणार आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदा गवाळी आणि हुळंदसारख्या शाळांतील शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आल्याने […]