
समांतर क्रांती / खानापूर
माजी आमदार आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अरविंद पाटील यांनी खानापूर तालुक्यात सहकाराचा विकास करतांना तळागाळातील शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवले. शेतकऱ्यांची सोय व्हावी, यासाठी त्यांनी कृषी पत्तीन सहकारी संघांचे जाळे विणले. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेअभावी कक्केरी भागातील शेतकऱ्यांची गैरसोय लक्षात घेऊन कक्केरीत शाखा कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आली. त्यामुळे या भागातील शेतकरी, नागरीक आणि स्व-सहाय्य संघांच्या कार्यकर्त्यांची सोय होणार असल्याचे मनोगत बिळकी – अवरोळी मठाचे मठाधिश चन्नबसव स्वामी यांनी व्यक्त केले.
शुक्रवारी कक्केरी येथे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या १०७ व्या शाखेचे उदद्घाटन बिळकी – अवरोळी मठाचे मठाधीश चन्नबसव स्वामी आणि प.पू. प्रभू अडवीसिध्देश्वर महास्वामी यांच्या दिव्य सानिध्यात पार पडले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष अप्पासाहेब मारुती कुलगुडे, खानापुर तालुक्याचे माजी आमदार आणि बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अरविंद चंद्रकांत पाटील साहेब, डीसीसी बँकचे प्रधान व्यवस्थापक एन.जी.कलावंत, सहाय्यक व्यवस्थापक श्री. कलमठ, कक्केरी कृषी पत्तीनचे अधध्यक्ष यल्लाप्पा भीमराव गुपित, बिस्टम्मादेवी देवस्थान समिती अध्यक्ष कार्तिक चंद्रशेखर अंबोजी, सहकार खात्याचे उपनिबंधक रवींद्र पाटील, रियाज पटेल आदी उपस्थित होते.
यावेळी कर्जवाटप आणि परिसरातील कृषी पत्तीन संघांचा आढावा घेण्यात आला. तसेच शेतकऱ्यांना कर्जवाटपांचे प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले. यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष अप्पासाहेब कुलगुडे यांनी माजी आमदार अरविंद पाटील यांनी बँकेचे संचालक म्हणून खानापूर तालुक्यातील कृषी पत्तीन संघांच्या विकासासाठी केलेले प्रयत्न वाखाणण्याजोगे आहेत, असे गौरवोद्गार काढले.
खानापूर हा दुर्गम तालुका म्हणून ओळखला जात असतांना येथील शेतकऱ्यांची स्थिती लक्षात घेऊन वेळोवेळी जिल्हा मध्यवर्ती बँक आणि सहकार खात्याकडे पाठपुरावा केला. तालुक्यातील कृषी संघांची पत वाढवून घेतली. त्यामुळे आज तालुक्याच्या चारही दिशांना शिवारांना बहर आला आहे. यासाठी कृषी पत्तीन संघांच्या अध्यक्ष आणि संचालकांनी दिलेले सहकार्य मोलाचे ठरले, असे मत जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक माजी आमदार अरविंद पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.
उद्घाटन कार्यक्रमाला कक्केरी, इटगी, बिडी भागातील कृषी पत्तीन संघांचे संचालक तसेच शेतकरी व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


अरविंद पाटील यांनी भर सभेतच मांडल्या समस्या.. जिल्हाधिकारीही ऐकतच राहिले.
समांतर क्रांती / खानापूर खानापूर हा देशातील एकमेव असा निसर्गरम्य तालुका आहे, ज्याची दखल प्रशासनाने घेतलेली नाही. येथील पर्यटनाला वाव दिला गेला नाही. केवळ वरवर कौतुक मात्र केले जाते, असा टोला माजी आमदार व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अरविंद पाटील यांनी जिल्हाधिकारी रोशन अहमद यांच्यासमोर लागवला. विशेष म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांनी याच सभेत खानापूरच्या निसर्ग संपदेचे तोंडभर […]