
समांतर क्रांती / चेतन लक्केबैलकर
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या १९ ऑक्टोबर रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. आता अधिकृतपणे निवडणुकीचे पडघम वाजायला सुरूवात झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील सर्वच जागांसाठी निवड अविरोध करण्यासाठी ‘सावकारां’नी शर्त चालविली असल्याने खानापूरच्या जागेचे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
काँग्रेसचे आमदार चन्नराज हट्टीहोळ्ळी यांच्या अनपेक्षित माघारीने खानापूरच्या संचालकपदाच्या निवडीने माजी आमदार तथा विद्यमान संचालक अरविंद पाटील यांची वाट मोकळी झाली आहे. जे पैशाच्या हव्यासाने त्यांच्यापासून पळ काढण्याच्या बेतात होते, ते पुन्हा त्यांच्या सावलीला येऊ लागले आहेत. अशातच पालकमंत्री सतीश जारकीहोळ्ळी यांनी ‘एन्ट्री’ मारल्याने अरविंद पाटलांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. शक्यतो, खानापूरची निवड अविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची चर्चा असून त्यासाठी सावकारांनीच पुढाकार घेतल्याने उत्सूकता शिगेला पोहचली आहे.
आमदार हट्टीहोळ्ळी यांच्या माघारीनंतर तालुक्यातील वातावरण जादुची कांडी फिरवल्यासारखे झटक्यात बदलले आहे. त्यामुळे युतीची ‘माती’ झाल्याने आमदार विठ्ठल हलगेकर यांनी आपण स्वत:च निवडणुकीच्या रिंगणात राहणार अशी घोषणा केली. मात्र हा फार्स असल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे. त्यांचे स्वकीयदेखील आमदार रिंगणात राहणारच नाहीत, त्यांच्याऐवजी त्यांचे समर्थक गर्लगुंजी कृषी पत्तीनचे राजू सिध्दाणी हे निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक असल्याचे बोलले जात आहे. ही चर्चा बाहेर पडल्यानंतर आमदार हलगेकर यांच्याकडे असलेले संख्याबळ निम्म्याहून निम्म्यावर आले आहे. साहजिकच, बहुतांश संघांनी माजी आमदार अरविंद पाटील यांचा पिच्छा पुरविण्यासाठी धावपळ चालविली आहे.
मुदलात, जिल्ह्यातील राजकारणाची हवा बदलली असून यावेळी अथणीवगळता इतर ठिकाणच्या निवडणुका अविरोध होण्याची दाट शक्यता आहे. यावेळी जारकीहोळ्ळी बंधूंनी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत वरचश्मा प्रस्थापीत करण्यासाठी कंबर कसली आहे. सुरूवातीलाच भाजपचे आमदार भालचंद्र जारकीहोळ्ळी यांनी अरविंद पाटील यांना समर्थन देत आमदार हलगेकरांना एकप्रकारे गप्प बसण्याचा इशाराच दिला होता. आता तर दस्तूरखुद्द पालकमंत्री सतीश जारकीहोळ्ळी यांनी माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांच्या आग्रहास्तव खानापूरच्या निवडीत हस्तक्षेप केल्याने राजकारणाची दिशाच बदलून गेली आहे. जारकीहोळ्ळी बंधू माजी आमदार अरविंद पाटील यांच्या पाठिशी ठाम असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तालुक्यातील बहुतेक कृषी पत्तीन संघांच्या संचालकांनी स्वत:हून अरविंद पाटील यांना संपर्क साधण्यास सुरूवात केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार आमदार हलगेकर यांनीदेखील ‘सेटलमेंट’ची तयारी दर्शविल्याचे समजते. कांही अटींवर ही निवड अविरोध करण्यात येण्याची शक्यता वाढली आहे. भाजपविरूध्द भाजप हा सामना टाळण्यासाठी जिल्हास्तरीय भाजप नेत्यांनी सुध्दा प्रयत्न चालविले आहेत. त्यात हलगेकर यांच्याकडे आमदारकी असल्याने अरविंद पाटील यांच्याकडे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालकपद असावे, अशी धारणा भाजप नेत्यांमध्ये असल्याचे बोलले जात आहे.
निवडणूक आवघ्या महिन्यांवर असून तालुक्यातील भाजपच्या या दोन नेत्यांपैकी कोण कुणाच्या हातात जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदाचे ‘सौभाग्य बंधन’ बांधणार याची उत्सूकता तालुकावासीयांना लागून राहिले आहे. दरम्यान, तालुक्यातील कृषी पत्तीन संघांचा आग्रहदेखील वाढत असल्यामुळे अरविंद पाटील यांच्याशिवाय पर्याय नाही, अशी चर्चा सुरू झाली आहे.


माजी मंत्री आर. व्ही. देशपांडे अडचणीत
समांतर क्रांती / कारवार एका महिला पत्रकारांशी उध्दट वर्तणुकीनंतर कर्नाटकचे प्रशासन सुधारणा आयोगाचे अध्यक्ष, आमदार आर. व्ही. देशपांडे अडचणीत आले आहेत. उत्तर कन्नड जिल्ह्यात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल का नाही? असा प्रश्न सदर महिला पत्रकाराने विचारला असता, तुमचे बाळंतपण करायचे आहे का? असा अपमानकारक सवाल करून देशपांडे यांनी राळ ओढवून घेतली आहे. त्यांच्या या वक्तव्याचा सर्वच […]