
समांतर क्रांती / खानापूर
अज्ञात वाहनाच्या धडकेत हरण ठार झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावर तिओलीवाडा क्रॉसनजीक रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घडली. सदर हरण रस्ता ओलंडत असतांना त्याला वाहनाची धडक बसली. वन खात्याच्या अधिकाऱ्यांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.
गुंजी विभागाचे सहायक वनपाल राजू पवार यांनी घटनास्थळी घटनेची शहानिशा केली. त्यानंतर उपवनसंरक्षक सुनिता निंबरगी आणि लोंढा वनविभागाचे वनक्षेत्रपाल वाय. पी. तेज यांनी घटनेचा पंचनामा केला. त्यानंतर मृत हरणावर अंत्यसंस्कार करण्यात आले. राष्ट्रीय महामार्गावर वन्य प्राण्यांना रस्ता ओलांतडण्यासाठी भुयारी आहेत. तरीही बऱ्याच वेळा प्राणी रस्त्यावर येत असल्याने अशा घटना वारंवार घडत असून वनखात्याची चिंता वाढली आहे.

Hit & Run : तरुणाचा मृत्यू
समांतर क्रांती / खानापूर चालत जाणाऱ्या तरुणाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारदरम्यान मृत्यू झाला. ही घटना खानापूर – जांबोटी मार्गांवर सोमवारी (ता. 17) घडली होती. शिवम संजय कुंभार (17, रा. नागूर्डावाडा) असे या तरुणाचे नाव आहे. शिवम हा नेहमीप्रमाणे घरापासून मोदेकोप फाट्यापर्यंत फिरायला गेला होता. तो घरी परत येत असताना त्याला […]