
समांतर क्रांती / खानापूर
डॉ. आंबेडकर ब्रिगेडची बैठक सोमवारी (ता.११) येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विश्रामगृहात पार पडली. बैठकीत ब्रिगेडचा संघटनात्मक विस्तार करण्याचा व शोषीत समाजाच्या समस्यांविरोधात आंदोलनास्त्र उगारण्याचा निर्णय घेण्यात आला. अध्यक्षस्थानी ब्रिगेडचे संस्थापक लक्ष्मण मादार होते.
अर्जून कांबळे यांनी उपस्थितांचे स्वागत आणि प्रास्ताविक केले. त्यानंतर बोलतांना अध्यक्ष लक्ष्मण मादार म्हणाले, तालुक्यातील दलित मागास समाजांवरील अन्यायात वाढ झाली आहे. त्यांच्या समस्यांकडे प्रशासन लक्ष द्यायला तयार नाही. अशा पार्श्वभूमीवर डॉ. आंबेडकर ब्रिगेडची संघटना बळकट करून कृतीशील पावले उचलण्याची गरज आहे. त्यासाठी विविध पातळ्यांवर संघटनात्मक विस्तार करण्यात येणार आहे. ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी जनसामान्यांच्या समसस्या जाणून घेत कार्यरत राहावे, असे आवाहन केले.
यावेळी आदित्य मादार, हाफिजसलिम बागवान, संतोष तळवार, अब्दूल कागजी, सुरेश कांबळे, सातेरी कोलकार, दीपक सोनटक्के, परशराम तळवार, प्रदीप गावे, मक्सूद जमादार, भीकाजी मादार यांच्याससह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.


नंदगड भागात बससेवेचा बोजवारा; प्रवाशी, विद्यार्थ्यांची हेळसांड
समांतर क्रांती / नंदगड खानापूर ते नंदगड आणि पुढे लिंगनमठपर्यंतच्या बससेवेचा पुरता बोजवारा उडाला आहे. खानापूर आगाराच्या मोजक्याच बसगाड्या या मार्गावर धावतात. त्यातही अनेक बस नादुरूस्त आहेत. अनियमीत धावणाऱ्या बसमुळे प्रवाशी आणि विशेषत: विद्यार्थ्यांची हेळसांड चालली आहे. बससेवा सुरळीत करण्याकडे कुणाचेच लक्ष नसल्याने प्रवाशी आणि विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. या मार्गावर हल्याळ आणि […]