
समांतर क्रांती / खानापूर
खानापूरच्या माजी आमदार आणि अखिल भारतीय काँग्रेसच्या सचिव डॉ अंजलीताई हेमंत निंबाळकर यांच्याकडे संघटन सृजन अभियानांतर्गत उत्तराखंडनंतर आता तेलंगनाचीही जबाबदारी पक्षाने सोपविली आहे. पक्ष संघटनेमधील त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्याकडे यापूर्वीही अनेक राज्यात संघटना सक्षम करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पुढील दहा दिवस त्या तेलंगणाच्या दौऱ्यावर असून त्या स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.
खानापूर तालुक्यातील जनतेने विश्वास ठेवून तालुक्याचे नेतृत्व करण्याची संधी दिली. तालुक्यातील जनतेच्या पाठबळामुळेच पक्षाने मला राष्ट्रीय पातळीवर काम करण्यास प्रवृत्त केले. पक्षाने दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाडतानाच माझ्या तालुक्यातील जनतेच्या समस्याकडे दुर्लक्ष होणार नाही, याची काळजी घेत आहे. त्यामुळे तालुक्यातील जनतेने त्यांच्या समस्या पक्षाकडे मांडाव्यात, त्या सोडविण्यासाठी आम्ही पुरेपूर प्रयत्न करू, असे डॉ. अंजली निंबाळकर यांनी म्हटले आहे.

अल्पवयीन तरूणीची आत्महत्या; आईने केला गंभीर आरोप
समांतर क्रांती / खानापूर अल्पवयीन तरूणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील देवलत्ती येथे घडली आहे. अश्विनी बसाप्पा कोलकार (वय १७) असे या तरूणीचे नाव असून खानापूर पोलिसात या घटनेची नोंद झाली आहे. गुरूवारी अश्विनी हिने घराच्या अंगणातील झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिचे नंद्दिहळ्ळी येथील तरूणावर प्रेम होते. तो तरूण अश्विनीला त्रास देत […]