
समांतर क्रांती / खानापूर
Dr. Waghmare paid a courtesy visit to the Prabodhankar Thackeray Library. राणी चन्नम्मा विद्यापीठातील मराठी विभागाचे प्रा. डॉ. चंद्रकांत वाघमारे यांनी येथील मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठान संचलित प्रबोधनकार ठाकरे वाचनालयाला नुकताच सदिच्छा भेट दिली. त्यांचे स्वागत अध्यक्ष नारायण कापोलकर यांनी केले. यावेळी डॉ. वाघमारे यांनी वाचनालयाला पुस्तके भेट दिली.
प्रसंगी त्यांनी आजच्या वाचन संस्कृतीबद्दल विषाद व्यक्त करतांना तरूण पिढीने वाचनाबाबत सजग होण्याची गरज निर्माण झाली असल्याचे मत व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी वाचनाकडे वळावे, यासाठी प्रतिष्ठानने हाती घेतलेला वाचनालय आणि आभ्यासिकेचा उपक्रम उत्तम असल्याचे ते म्हणाले. विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहनदेखील त्यांनी केले. तसेच वाचनालयाच्या ‘प्रबोधन’ दिवाळी अंकाबद्दल त्यांनी प्रशंसा केली.
यावेळी सचिव वासुदेव चौगुले, सहसचिव प्रल्हाद मादार, खजिनदार ईश्वर बोबाटे, ग्रंथपाल चेतन लक्केबैलकर, मऱ्याप्पा पाटील, ॠतिक कुंभार, राजू जांबोटकर आदि उपस्थित होते.


स्नेहमीलनातून जपले कौटुंबिक ऋणानुबंध
समांतर क्रांती / खानापूर कुटुंब व्यवस्थाच काळाच्या पडद्याआड जात असतानाच्या काळात मणतुर्गा येथील बोबाटे कुटुंबियांनी स्नेहमिलानातून नात्याची वीण अधिक घट्ट करीत एक अनोखा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. मराठी संस्कृतिक प्रतिष्ठानचे खजिनदार ईश्वर बोबाटे यांनी यासाठी पुढाकार घेतला. स्पर्धेच्या युगात नाती केवळ नावापुरतीच शिल्लक राहिली आहेत. कामाच्या धबागड्यात भाऊ -बहीण आणि नातेवाईक एकत्र येणे दुरापास्त झाले […]