
समांतर क्रांती / खानापूर
सध्या शाळा-महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना निवडणूक आणि मतदान प्रक्रियेची ओळख व्हावी, यासाठी निवडणुकांचे आयोजन केले जात आहे. येथील रावसाहेब वागळे पदवीपूर्व महाविद्यालयातील नुकताच निवडणूक पार पडली.
यावेळी उमेदवारी अर्ज भरणे, अर्ज माघार घेणे, उमेदवारांना चिन्ह वाटप करणे, प्रचार यंत्रणा राबविणे, मतदान करण्यासाठी ओळख पत्र म्हणून आधार कार्डचा वापर करणे, मतमोजणी आणि सुरक्षा इत्यादी बाबींची माहिती विद्यार्थ्यांना करून देण्यात आली.
मतदान प्रक्रिया खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. निवडणुकीत जनरल सेक्रेटरी म्हणून कु. देवानंद शेळके, विद्यार्थिनी प्रतिनिधी. कु. रसिका गावडा, क्रिडा प्रतिनिधी कु. रोहन कांबळे, कु. रेणुका तोरगल कु.मोहिनी देसाई ,सांस्कृतिक विभाग प्रतिनिधी कु. प्रणाली घाडी, परीक्षा विभाग प्रतिनिधी कु. सानिका तिनेकर, सहल विभाग प्रतिनिधी कु.काजल गावडे, ग्रंथालय प्रतिनिधी कु.वनश्री चाफळकर, वर्ग प्रतिनिधी कु. प्रणाली देसाई, कु. प्रदीप अवणे, कु. ममता जोशीलकर, कु. कृणाल पंडित यांनी विजय संपादन केला.
निवडणूक पार पाडण्यासाठी प्राचार्या शरयू कदम, निवडणूक अधिकारी म्हणून प्रा. गुंडू कोडला, प्रा. संदिप पाटील यांनी काम पाहिले. प्रा. डी.व्ही. पाटील, प्रा.प्रकाश पाटील, प्रा.रेणुका पाटील, प्रा.सोनी गुंजीकर, प्रा.इमिलिया फर्नांडिस, देवेंद्र घाडी, शिवाजी बेतगावडा यांचे विशेष सहकार्य लाभले.

गोकर्ण: नऊ महिन्यांपूर्वी झाला मुलाचा मृत्यू; रशियन महिलेने सांगितली धक्कादायक माहिती
समांतर क्रांती / गोकर्ण Gokarna: Child died nine months ago; Russian woman reveals shocking information रशियन महिला नीना कुटीना उर्फ मोही हीने काल ए.एन.आय.शी संवाद साधला. यावेळी तिने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. त्यात तिने नऊ महिन्यांपूर्वी तिच्या मोठ्या मुलाचा मृत्यू झाल्याचे सांगितले. अस्थी पोलिसांनी नेल्या असल्याचेही तिने नमुद केले आहे. पण, तिने त्या मुलाचा […]