समांतर क्रांती / खानापूर
विद्युत तारांचा स्पर्श होऊन दोन हत्ती दगावल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली आहे. यामुळे खानापूर तालुक्यातील वनविभागात खळबळ उडाली आहे. तालुक्यातील सुळेगाळी गावाजवळ शेतवडीत मुक्तसंचार करणाऱ्या हत्तीवर काळाने घाला घातला आहे. याबाबतची अधिक माहिती अशी, गणपती गुरव यांच्या शेतात सौर कुंपण लावण्यात आले होते. त्यावर हेस्कॉमच्या वीज तारा तुटून पडल्याने अतिरिक्त वीज पुरवठा सुरु झाला. याचदरम्यान, दोन हत्तीनी त्यांच्या शेतात घुसण्याचा प्रयत्न केला असता विजेचा धक्का बसून त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वनख्यात्याच्या अधिकाऱ्यांनी धाव घेऊन पंचनामा केला. या प्रकरणी तपास सुरु असल्याचे वनधिकाऱ्यांनी सांगितले.

खानापूर तहसीलदारांना दणका ; बदलीचे आदेश
समांतर क्रांती /खानापूर जमिनीच्या सर्वेक्षणाचा उच्च न्यायालयाचा आदेश असतानाही त्याची कार्यवाही करण्यास टाळाटाळ करणारे खानापूरचे तहसीलदार दुंडाप्पा कोमार यांची तात्काळ बदली करण्याचा आदेश उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाने बजावला आहे. असोगा ता. खानापूर येथील सर्वे नंबर 108 मधील 2 एकर 20 गुंठे जमीनीच्या सर्वेक्षणासाठी उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठात 114086/2019 ही याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर […]