जोयडा : कारवार- गोवा सीमेवरील माजाळी तपासणी नाक्यावर तपासणी दरम्यान खासगी बसमध्ये पोलिसांना तब्बल १ कोटींची अवैध रोकड सापडली आहे. ही रोकड गोव्यातून बेंगळुरूकडे नेण्यात येत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
ही घटना मध्यरात्री उघडकीस आली. नियमित तपासणीदरम्यान पोलिसांनी बसमधील प्रवाशांच्या बॅगा तपासल्या असता, राजस्थान येथील कल्पेश कुमार नावाच्या प्रवाशाच्या बॅगेत मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आढळली. त्याच्यासोबत भामृकुमार नावाची आणखी एक व्यक्ती प्रवास करत होती, असे पोलिसांनी सांगितले.
जप्त केलेली रोकड उच्च मूल्याच्या नोटांमध्ये असून, तिचा मालक आणि स्त्रोत याबाबत अद्याप स्पष्टता नाही. याप्रकरणी चित्तकुल ( सदाशिवगड) पोलिसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.प्राथमिक चौकशीत या रकमेचा संबंध बेकायदेशीर व्यवहार, हवाला नेटवर्क किंवा राजकीय निधीशी असू शकतो, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. तथापि, याबाबत अद्याप अधिकत पष्टी झालेली नाही.

अंडरवर्ल्ड डॉनचा हस्तक दानिश चिकना जेरबंद
पणजी : अंडरवर्ल्डचा डॉन दाऊद इब्राहिम याच्या अमली पदार्थांच्या साम्राज्यावर अखेर मोठा घाव बसला आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) ने रविवारी मध्यरात्री गोव्यात गुप्त कारवाई करत दाऊदचा विश्वासू साथीदार आणि मुंबईतील ड्रग्ज नेटवर्कचा किंगपिन दानिश चिकना याला जेरबंद केले.गेल्या काही वर्षांपासून त्याने गोव्यासह कर्नाटकात देखील ड्रगचे साम्राज्य विस्तारले होते. अर्पोरा (हडफडे) परिसरात राबवलेल्या या कारवाईदरम्यान […]