समांतर क्रांती / खानापूर
येथील प्राचिन कवळे मठाच्या जमिनीवर हुबळी येथील कांहींनी अतिक्रमण केले आहे. दादागिरी करीत त्यांनी जमिनीतील एका अस्थापनात ठाण मांडले आहे. याबाबत पोलिसांकडे तक्रार केल्यानंतरही दखल घेतली जात नसल्याने कवळे मठाच्या देशभरातील भक्तांमध्ये संतापाचे वातावरण आहे, अशी माहिती मठाचे मठाधिश शिवानंद सरस्वती स्वामिजींनी दिली. मठाच्या सभागृहात ते पत्रकारांशी बोलत होते. Encroachment on the land of Kavale Math in Khanapur.
येवळी या प्रकरणाबाबत सखोल माहिती देतांना शरद केशकामत म्हणाले, सर्व्हे क्र. ३०, ३८, ४० आणि ४५ मधील जमिन ही कवळे मठाच्या मालकीची असून १९२९ साली ती पायोनिअर इंडस्ट्रिज वर्क्स या कंपनीला भाडेतत्वावर देण्यात आली होती. त्या कंपनीचे सर्व संचालक हे खानापूरचे रहिवासी होते. कालांतराने कंपनीच्या संचालक मंडळात नारायण तिमाप्पा शानभाग यांचा समावेश करण्यात करण्यात आला. त्यांनी कुमठा येथील काशीनाथ सीताराम नायक यांना संचालक मंडळात समाविष्ट केले.
नारायण शानभाग यांचे पुत्र प्रकाश शानभाग यांनी कंपनीची सुत्रे हाती घेतली. सध्या प्रकाश यांचे मुलगा उदय, मुलगी दीपा आणि काशीनाथ नायक यांचा मुलगा किरण हे कंपनीचे संचालक आहेत. १९६० साली भाडे व्यवहाराचा कालावधी संपल्यानंतर सदर कंपनीला जमिन कवळे मठाला परत करण्यास सांगण्यात आले. पण, कंपनीने जमिन परत केली नाही. त्याउलट या संचालकांनी जमिनीचे सामान्य मुखत्यारपत्र चेतन अशोक भारद्वाज यांना दिली आहे. त्यांच्या पत्नी हुबळीच्या महापौर राहिल्या असून ते राजकीय राजकीय बळाचा वापर करीत आहेत.
भारद्वाज यांचा हस्तक कांडी रविकुमार याने अचानक मठाच्या जमिनीवर अतिक्रमन केले आहे. याबाबत मठाच्यावतीने शरद केशकामत यांनी खानापूर पोलिस निरीक्षक तसेच जिल्हा पोलिस प्रमुखांकडे तक्रार नोंदविली होती. पण, पोलिसांनी कोणत्याच प्रकारची कारवाई केलेली नाही. उलट पोलिस कांडी रविकुमार याला पाठीशी घालत आहेत. रविकुमारने राज्य घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेला फलक लावून कवळे मठाच्या जमिनीवर ठाण मांडले आहे. कवळे मठाच्या भक्तांवर ॲट्रॉसिटीसारखे गंभीर गुन्हे दाखल करण्याचा त्याचा प्रयत्न सुरू असल्याचे मत श्री. केशकामत यांनी मांडले. गेल्या वर्षांपर्यंत ती जमिन मठ प्रशासनाकडून कसली जात होती. ऊसाची लागवड करण्यात आली होती.
कवळे मठाच्या जमिनीशी कोणत्याही प्रकारचा संबंध नसतांना रविकुमार यांने दादागिरी चालविली असून याबद्दल खानापूर शहरवासीयांत सुध्दा संतापाची लाथ उसळली आहे. देशभरातील मठाच्या भक्तांमध्ये असंतोषाचे वातावरण असून खानापुरात तीव्र आंडोलन छेडण्याची तयारी सुरू असल्याची माहिती यावेळी श्री. केशकामत यांनी पत्रकारांना दिली. यावेळी अॅड. प्रधुम्न भाटे, ॲड. पद्मा हल्याळी, ट्रस्टी निलेश बोरकर,उद्योजक किसन चौधरी, पत्रकार प्रकाश देशपांडे आदी उपस्थित होते.

अरविंद पाटील यांच्यामुळे भाजपला बळ मिळाले : संजय पाटील
समांतर क्रांती / खानापूर माजी आमदार अरविंद पाटील हे प्रचंड उर्जा लाभलेले नेते आहेत. जनतेची कामे करून देताना ते कधीच थकत नाहीत, म्हणून खानापूर तालुक्याच्या जनतेचे त्यांच्यावर प्रेम आणि विश्वास आहे. त्या विश्वासाला पात्र राहून त्यांनी जनकल्याणाचे कार्य अविरतपणे चालविले आहे. ते भाजपमध्ये आल्यानंतर पक्षाला बळ मिळाले. विठ्ठल हलगेकर यांना आमदार करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा […]