समांतर क्रांती / खानापूर

Engineer dies after drowning in river after going to party मित्रांसमवेत पार्टीसाठी गेलेल्या तरूण आयटी अभियंत्याचा पांढरी नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना जोयडा तालुक्यातील चांदवाडीनजिक घडली. ईरशाद अहमद मुगुटसाब हुक्केरी (वय ३५, रा. दांडेली) असे त्याचे नाव असून रामनगर पोलिसात घटनेची नोंद झाली आहे. इरशाद हा त्याच्या मित्रांसमवेत पार्टीसाठी पांढरी नदी काठावर गेला होता. जेवण उरकल्यानंतर सर्वजण पोहायला पाण्यात उतरले. इरशादला पोहता येत नव्हते. त्यामुळे तो पाण्यात बुडाला. ही बाब लक्षात येताच त्याच्या मित्रांनी त्याला पाण्याबाहेर काढून रामनगर येथील शासकीय इस्पितळात आणले. पण, तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. घटनेची नोंद रामनगर पोलिसात झाली असून अधिक तपास सुरू आहे.

गवाळीतील शेतकऱ्यावर गव्याचा हल्ला, गंभीर जखमी आवस्थेत..
समांतर क्रांती / खानापूर शेतात काम करीत असतांना शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना भीमगड अभयारण्यातील गवाळी येथे आज शुक्रवारी (ता. २४) दुपारी घडली. या हल्ल्यात प्रकाश कृष्णा गुरव (५०) हा गंभीर जखमी झाले असून त्याना बेळगावला अधिक उपचारासाठी हलविण्यात आले आहे. प्रकाश गुरव हे नेहमीप्रमाणे आपल्या शेतात शेतकाम करीत असतांना अचानक गव्याने त्यांच्यावर हल्ला केला. […]