
समांतर क्रांती / गोकर्ण
Gokarna: Child died nine months ago; Russian woman reveals shocking information रशियन महिला नीना कुटीना उर्फ मोही हीने काल ए.एन.आय.शी संवाद साधला. यावेळी तिने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. त्यात तिने नऊ महिन्यांपूर्वी तिच्या मोठ्या मुलाचा मृत्यू झाल्याचे सांगितले. अस्थी पोलिसांनी नेल्या असल्याचेही तिने नमुद केले आहे. पण, तिने त्या मुलाचा मृत्यू का झाला व त्याच्यावर अंत्यसंस्कार कुठे याबाबत मात्र माहिती दिलेली नाही.
एकंदरच, गोकर्णजवळ गुहेत दोन मुलींसह वास्तव्यास राहिलेल्या नीना हिच्याबद्दल आता नवनवे खुलासे समोर येऊ लागले आहेत. २०१७ मुदत संपलेला व्हीसा जुना असून नवा व्हीसा हरवल्याचे तिचे म्हणणे आहे. भारतात येण्यापूर्वी तीन देशात राहून आल्याचे तिने म्हटले आहे. केवळ गोकर्ण येथील रामतिर्थ डोंगरातच नाही तर भारतात विविध भागातील जंगलात वास्तव्य केल्याचे नीना हिने म्हटले आहे.
गेल्या १५ वर्षात तिने २० देशांमध्ये वास्तव्य केले आहे. तिची मुले वेगवेगळ्या ठिकाणी जंगलात जन्मली. डॉक्टर आणि इतर कुणाच्याही मदतीशिवाय तिने प्रसूती केल्याचा दावा केला आहे. व्हिडीओ, शिकवणी आणि मुलांच्या संगोपनातून ती पैसे मिळवायची. त्याशिवाय तिचे वडील, भाऊ आणि मुलगा तिला गरज असेल तेव्हा पैसे पाठवत असत, असेही तिने सांगितले आहे.
जंगलातील जीवनाची आम्हाला सवय झाली होती. आम्ही सर्योदयानंतर आंघोळ करीत असू. त्यानंतर दिवसभर पेंटिंग करणे, गात होतो, पुस्तके वाचचत होतो. गॅस किंवा लाकडावर स्वयंपाक करून कात होतो, असे आमचे जीवन आनंदात चालले होते. पण, आता हे सगळं हिरावलं गेलं आहे, अशी खंतदेखील तिने व्यक्त केली आहे. गुहेपासून जवळच्या गावातून आवश्यक साहित्य खरेदी करीत होती.
तिला रशियाला पाठविण्याचे सोपस्कार सुरू कररण्यात आले असून तिने आपण रशियन दुतावासाच्या संपर्कात असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, तिचा पती मोठा उद्योजक असल्याची चर्चा आहे.

‘सर्जा-राजा’ बुडाले; मालकांच्या आक्रोशाने परीसर दणाणला..
समांतर क्रांती / खानापूर पशूधन हीच शेतकऱ्याची संपत्ती असते. त्यामुळे शेतकरी आपल्या जनावरांना पोटच्या पोरांप्रमाणेच सांभाळत असतो. जनावरेही आपल्या मालकाला जीव लावतात. पण, एखाद्या घटनेत जनावरांवर संकट ओढवल्यास मालकाची काय अवस्था होते, याची प्रचिती काल बेकवाड येथे आली. दोन बैल पाण्यात बुडून ठार झाल्याच्या घटनेनंतर मालक आणि त्याच्या मुलांनी चालविलेला आक्रोश हृदय पिवळटून टाकणारा होता. […]