
समांतर क्रांती / गोकर्ण
गोकर्ण येथील रामतीर्थ डोंगरावरील गुहेतआढळलेली महिला नीना कुटीना हिच्याबद्दलचे गुढ दिवसेदिवस वाढत चालले आहे. आठ वर्षे ती त्या भयावह गुहेत कशी राहिली, तीचा उदरनिर्वाह कसा चालत होता, त्यासाठीचा खर्च कसा केला जायचा, यासह तीला जर सहा आणि चार वर्षांच्या मुली असतील आणि त्यांचा जन्म त्या गुहेतच झाला असेल तर त्या मुलींचा बाप कोण? याबाबत अद्याप उलगडा झालेला नाही.

२०१६ मध्ये नीना ही भारतात बिझनेस व्हीसावर आली होती. २०१७ मध्येच तिच्या व्हीसाची मुदत संपली. त्यानंतर नेपाळमधून तीने रशियाला जाण्याचा प्रयत्न केला. पण, ती परत न जाता गोव्यात आली. तेथून ती २०१८ पासून गोकर्ण येथील रामतीर्थ डोंगरावरील गुहेत वास्तव्य करून आहे. ९ जुलै २०२५ रोजी ती दोन मुलींसह गुहेत आढळली. सध्या तिला महिला आणि बालकल्याण खात्याच्या आश्रमात ठेवण्यात आले आहे.
ज्यावेळी नीना उर्फ मोही ही तिच्या दोन मुलींसह गुहेत आढळली तेव्हा गुहेत रुद्राची मुर्ती, हिंदू देव-देवतांचे फोटो आणि रशियन पुस्तके आढळली. आपण धार्मिक विधी व आधात्मात गढून गेलो होतो. पोलिसांनी जंगलातून बाहेर काढल्यानंतर आमचे शांत आणि मोकळं आयुष्य संपलं असे तिने पोलिस अधिकारी आणि तिच्या एका मित्राला पाठविलेल्या संदेशात म्हटले आहे.
दरम्यान, ती दोन मुलींसह गुहेत कशी काय राहिली? असा प्रश्न पडला आहे. त्यातही आठ वर्षे गुहेत राहणाऱ्या नीना उर्फ मोहीला चार आणि सहा वर्षांच्या मुली कशा? त्यांचा जन्म जंगलातच झाला असेल तर त्यांचा बाप कोण? अशा प्रश्नांनी तपास अधिकाऱ्यांना भंडावून सोडले आहे. केवळ नुडल्स आणि जंगली फळांवर त्या आठ वर्षे कशा काय जगल्या? तीच्या समवेत गुहेत अन्य कुणी होते का? असे गुढमय प्रश्नही तपास अधिकाऱ्यांना पडले असून त्यांची उत्तरे नीना उर्फ मोहीकडून अद्याप मिळालेली नाहीत.
तिला रशियाला पाविण्याची तयारी केली जात असून तत्पूर्वी तिच्याकडून उपरोक्त प्रश्नांची उत्तरे मिळविण्यासाठी तपास अधिकाऱ्यांनी शर्त चालविली आहे. त्यात त्यांना यश मिळणार का?

चोर्ला घाटात दरड कोसळून ट्रक गेला दरीत.. मणतुर्गा पूल पाण्याखाली..
समांतर क्रांती /चोर्ला चोर्ला घाटात काल सोमवारी (ता.१४) मुसळधार पाऊस कोसळत असून आज मंगळवारी (ता.१५) सकाळी घाटात दरड कोसळली. त्यामुळे कांही काळ चोर्ला महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान, त्याच ठिकाणी एक सिमेंटची वाहतूक करणारा ट्रक दरीत उलटला असून सुदैवाने चालक बचावला आहे. मात्र, ट्रकमधील साहित्य आणि ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे सांगण्यात येत […]