
बंगळूर : गोकर्ण येथील रामतिर्थ डोंगरावरील गुहेत दोन मुलींसह आढळलेल्या रशियन महिलेबाबत आणखी नवी माहिती समोर आली आहे. त्या मुलींचा बाप ब्रार गोल्डस्टीन यांनी एका वृत्तपत्राशी बोलतांना अनेक खुलासे केले आहेत. शिवाय त्यांचे एकत्रीत छायाचित्र सुध्दा प्रसिध्द झाले आहे. आपण नीना आणि प्रेया व अमा यांचा स्विकार करायला तयार असल्याचे ब्रार यांनी म्हटले आहे.
नीना ही तीन मुलांसह भारतात आली होती. त्यापैकी एका मुलाचा गेल्या ऑक्टोबर महिन्यात अपघाती मृत्यू झाला होता. नीना हिला पहिल्या पतीपासून दोन मुलगे होते. त्यातील एकाचा मृत्यू झाल्याचे यापूर्वीच तीने एका वृत्तवाहिनीशी बोलतांना सांगितले होते. तर ब्रार यांच्यापासून त्यांना दोन मुली झाल्या. त्यातील एका मुलीचा जन्म युक्रेनमध्ये असतांना झाला, तर दुसरीचा जन्म भारतात झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. नीना ही रागीट असून ती आपल्यासमवेत राहायला तयार नव्हती. शिवाय तीने अलिकडे सपर्क तोडला होता, पण त्या तिघींनाही आपण इस्त्रायलला घेऊन जायला तयार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

गोल्डस्टीन यांनी त्याच्या मुलींचा ताबा आपल्याकडे दिला जावा,अशी मागणी एफआरआरओकडे केली आहे. नीना ही मुलींना शाळेला पाठवायला तयार नाही. त्यांचा इतर समाजाशी संपर्क तोडला गेला आहे. जंगलात राहणे मुलींसाठी धोक्याचे आहे, असे असतांनाही तीने आपला हेला सोडला नाही. मागच्या डिसेंबर महिन्यात गोल्डस्टीन यांनी नीना हिच्या वर्तणुकीविषयी गोव्यातील पणजी पोलिस स्थानकात तक्रार नोंदविल्याची माहितीदेखील समोर आली आहे.
सध्या नीना आणि तिच्या मुलींना रशियाला परत पाठविण्याचे सोपस्कार सुरू झाले असले तरी त्याला एक महिन्यांचा कालावधी लागणार आहे. तोपर्यंत अनेक खुलासे या प्रकरणात होण्याची शक्यता आहे.
गोल्डस्टीन आहे उद्योजक
इस्त्रायली उद्योजक असलेला ब्रार गोल्डस्टीन (वय ३८) हा २०१७ मध्ये नीनाला भेटला तेव्हापासून ते दोघे ‘रिलेशनशशीप’मध्ये आहेत. त्याच्यापासून नीनाला प्रेया (वय ६) व अमा (वय ४) या मुली असून ते सर्वजन बराच काळ एकत्रही राहिले आहेत. त्यांचे एकत्रीत छायाचित्रदेखील गोल्डस्टीनने प्रसारमाध्यमांकडे दिले आहे.

करायला गेले सोय, झाली गैरसोय..
समांतर क्रांती / खानापूर Citizens are suffering unnecessarily due to unprofessional work carried out in many places. In addition, there is a risk of accidents. ‘सरकारी काम सहा महिने थांब’ ही म्हण प्रचलित असतांनाच ‘करायला गेले सोय, झाली गैरसोय’ अशी नवीच म्हण खानापूर तालुक्यात रुढ होऊ लागली आहे. अनेक ठिकाणी अवैद्यानिकरित्या झालेल्या कामांमुळे नागरिकांना नाहक […]