
समांतर क्रांती / गोकर्ण
गोकर्ण येथील रामतिर्थ डोंगरातील एका गुहेत रशियन ४० वर्षीय महिला आणि तिच्या दोन मुली आढळल्या आहेत. दरम्यान, घनदाट जंगलातील या गुहेत त्या कशा जिवंत राहिल्या? त्या काय खाऊन जगत होत्या? कशा राहत होत्या? ती महिला गुहेत राहून नक्की काय करीत होती? असे अनेक प्रश्नांनी सर्वसामान्यांना हैराण करून सोडले आहे.
शुक्रवारी (ता.११) गोकर्ण येथील रामतिर्थ डोंगरावर दरड कोसळल्याची घटना घडली होती. त्यामुळे कांही हानी झाली आहे का? याची चाचपणी करण्यासाठी गस्त घालणाऱ्या पोलिसांना एका गुहेजवळ कपडे वाळत घातल्याचे दिसले. माणसांच्या हालचाली दिसल्याने पोलिस निरीक्षक श्रीधर व त्यांच्या सहकारी गुहेजवळ गेले असता त्यांना धक्काच बसला. त्या गुहेत चक्क एक महिला आणि दोन मुली राहत असल्याचे आढळून आले. रशियन महिला नीना कुटीना उर्फ मोही (वय ४०) व तिच्या मुली प्रेया (वय ६) आणि अमा (वय ४) यांना पाहून पोलिसही चक्रावले.

गुहेत होती रुद्राची मूर्ती..
नीना हिच्याकडे चौकशी केल्यानंतर तिने गुहेत ध्यान धारणा आणि पूजा करीत असल्याचे पोलिसांना सांगितले. गुहेत तीने रुद्राची मूर्ती पूजल्याचे दिसून आले. पासपोर्ट आणि व्हीसाबाबत चौकशी केली असता, तीने ते हरवल्याचे सांगितले. पण, पोलिसांना वनकर्मचाऱ्यांच्या मदतीने पासपोर्ट आणि इतर कागदपत्रे शोधून काढण्यात यश मिळाले असल्याचे पोलिस अधिक्षक एम.नारायण यांनी सांगितले.

काय खात होत्या? कशा राहिल्या?
त्या तिघी केव्हापासून गुहेत राहत होत्या याबाबत निश्चित माहिती मिळालेली नाही. पण, केवळ सुदैवानेच त्यांना जंगलात कांही झाले नाही. रामतिर्थ डोंगरात अनेक हिस्त्र आणि विषारी प्राणी आहेत. त्यांचा झोपण्यासाठी प्लास्टिक वापरत असत तर केवळ न्युडल्स खाऊन त्यांची गुजराण चालली होती, अशी धक्कादायक माहिती पोलिस अधिक्षक एम. नारायण यांनी दिली.सुरक्षेच्या कारणास्तव सध्या त्या तिघींनाही बालकल्याण खात्याच्या विश्रामगृहात ठेवण्यात आले असून त्यांना रशियाला परत पाठटविण्यासाठी प्रक्रिया हाती घेतली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

कोयत्याचा धाक.. अल्पवयीन मुलाला मारहाण; व्हीडीओ व्हायरल..पुढे काय झाले?
समांतर क्रांती वृत्त / खानापूर कोयत्याचा धाक दाखवून अल्पवयीन मुलाला जबर मारहाण करण्यात आल्याचा व्हीडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर तब्बल २० दिवसांनी पोलिसांत तक्रार दाखल झाली आहे. सदर घटना रामनगर (ता. जोयडा) येथे घडली असून पोलिस काय कारवाई करणार? याकडे पालकांसह नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. रामनगर येथील एका अल्पवयीन मुलाला कोयत्याचा धाक दाखवून मारहाण […]