समांतर क्रांती / जोयडा
तालुक्यातील पणसोली हत्ती शिबिरात वाढलेली ‘गौरी’ नावाची दोन वर्षांची मादी हत्ती आज आजारपणामुळे मृत्यूमुखी पडली.
गौरीचा जन्म पणसोल्ली वन्यजीव वसाहतीतच झाला होता. गेल्या महिन्याभरापासून तिच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने सतत उपचार सुरू होते. मात्र उपचाराला प्रतिसाद न दिल्याने आज सकाळी तिने अखेरचा श्वास घेतला.
वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गौरीची शवचिकित्सा करण्यात आली असून, अंत्यसंस्कार पणसोली येथील जंगलात पार पडले. या मृत्यूमुळे हत्तीप्रेमी आणि वन्यजीव प्रेमींमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.


नंदगड येथील अंगणवाडी शिक्षिकेच्या खूनप्रकरणी एकजण ताब्यात
समांतर क्रांती / रामनगर बेळगाव–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील तीनईघाट (पालडा रस्ता क्रॉस) येथील पुलाखाली शनिवारी रात्री एका महिलेचा मृतदेह सापडला होता. नंदगड येथील अंगणवाडी शिक्षिका अश्विनी बाबुराव पाटील (वय ५०, रा. नंदगड) यांचा मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले होते. याप्रकरणी एकास रामनगर पोलिसांनी शंकर पाटील नामक रिक्षा चालकाला ताब्यात घेतले आहे. त्याची कसून चौकशी केली जात आहे. […]