
अॅड. एच.एन.तथा हिंदूराव देसाई यांचा जन्म कापोली या खानापूर तालुक्यातील छोट्याशा गावात बर्यापैकी सधन घराण्यात झाला असला तरी त्या काळात हे गाव तसे दुर्गमच होते. आजच्यासारख्या सोयी-सुविधा त्या काळात नव्हत्या. मात्र शिकण्याची जिद्द असल्याने अॅड. एच.एन. देसाई यांनी वकिलीचे शिक्षण घेत त्या भागातील पहिले वकील होण्याचा मान मिळविला. त्यावेळी त्यांचे मोठे कौतूक झाले.
निष्णात वकील..

हिंदूराव यांना या क्षेत्रात नावलौकीक मिळवायचा होताच, त्याहून अधिक त्यांना रांजल्या-जांजल्यांना न्याय मिळवून देण्यात अधिक रस होता. त्यामुळे साहजिकच त्यांना यामध्ये यश मिळत गेले. सुरूवातीला त्यांची वकिली केवळ खानापुरातील न्यायालयापुरती मर्यादीत होती. पण, नंतरच्या काळात त्यांनी मागे वळून पाहिले नाही. त्यांनी झपाट्याने जिल्हा न्यायालयातही आपला ठसा उमटविला.
न्यायालयीन कामकाजात ते निष्णात असल्यामुळे एच.एन.वकील ही बिरूदावलीच त्यांना सर्वसामान्य नागरीकांनी देऊन टाकली. बेळगाव आणि खानापूरमधील त्यांच्या कार्यालयातील अशिल आणि न्यायाच्या आपेक्षेने येणार्या सामान्य नागरीकांची गर्दी ही त्यांच्या वकिली क्षेत्रातील त्यांच्या यशाचे जणू प्रतिकच म्हणावे लागेल. त्यांनी स्वत: गेली ४२ वर्षे वकिली चालविली आहेच; शिवाय या क्षेत्रातील ४० हून अधिक नवख्या वकिलांनादेखील त्यांनी मार्गदर्शन केले आहे.त्यातील ६ जण कर्नाटकातील विविध न्यायालयात न्यायाधिश आहेत. अजुनही करीत आहेत. यामुळे त्यांचा वकिली क्षेत्रात मोठा नावलौकीक आहे.

सहकार तज्ज्ञ – नेते
अॅड. एच.देसाई यांनी त्यांचे कार्य केवळ वकिलीपूरताच मर्यादित न ठेवता, हालसाल येथे श्री माऊलीदेवी पथसंस्थेची स्थापना करून सहकार क्षेत्रात पदार्पन केले. खेड्यापाड्यातील लोकांना आर्थिक सहाय्य व्हावे, हा त्यांचा यामागील हेतू होता. त्यानंतर त्यांनी व त्यांच्या मित्रांनी खानापूर तालुक्याच्या सहकार क्षेत्रात दिपस्तंभ ठरेल अशी भाग्यलक्ष्मी पतसंस्था स्थापन केली. या संस्थेचे ते संस्थापक संचालक. त्यांनी संस्थेचे चेअरमन म्हणून संस्थेला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्यात कोणतीही कसर सोडली नाही. आजदेखील ते या संस्थेचे संचालक म्हणून योगदान देत आहेत.

मुत्सद्दी राजकारणी..
अॅड. एच.एन.देसाई हे एक मुत्सद्दी राजकारणी आहेत. ते अनेक वर्षांपासून निधर्मी जनता दलाचे नेते म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी सुरूवातीच्या काळात खानापूर शहरात नगरसेवक म्हणूनदेखील त्यांच्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला. माजी पंतप्रधान देवेगौडा, माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे केंद्रीय मंत्री एच.डी.देवेगौडा यांचे ते निकवर्तीय म्हणून ओळखले जातात. ते निजदचे नेते असले तरी त्यांचा इतर पक्षातील नेत्यांशीदेखील तितकाच सहज आणि स्वाभाविक संबंध व संपर्क राहीला आहे.

दानशूर व्यक्तीमत्व..
तालुक्यात ते दानशूर व्यक्ती म्हणूनही ते परिचीत आहेत. त्यांनी अनेक अडल्या-नडल्यांना मदत केली आहे. अनेक मंदिरांना सढळहस्ते आर्थिक सहाय्य करण्यात ते कधीच हात आखडता घेत नाहीत, हे विशेष. ते सामाजिक क्षेत्रात वावरत असतांनाच मित्रमंडळीतही ते सर्वांचे लाडके आहेत. अशा या कुटुंबवत्सल व्यक्तीचा ६८ वा वाढदिवस साजरा होत असतांना त्यांना दिर्घायुष्य लाभो, ही सदिच्छा..!


खड्ड्यांनी घेतला महिलेचा बळी
समांतर क्रांती / खानापूर खानापूर तालुक्यातील रस्त्यांची चाळण झाली असून सर्वच रस्ते जीवघेणे बनले आहेत. तिओली रस्त्यावरील खड्ड्यांनी एका महिलेचा बळी घेतला असून अजून किती बळी गेल्यानंतर तालुक्यातील लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांना जाग येणार असा संतप्त प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. महिनाभरापूर्वी तिओली ते तिओली पुलापर्यंतच्या खड्डयांतील रस्त्यावर दुचाकीवरून पडून तिओली येथील हभप लक्ष्मी रामू गावडा […]