
समांतर क्रांती वृत्त
नंदगड: नागरगाळीचे जंगल हे सागवानसाठी प्रसिध्द आहे. नेहमीच तेथे सागवानची तस्करी होत असल्याच्या तक्रारी वनखात्याकडे येत असतात. त्यावरून आज वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी कृष्णानगर (गवळीवाडा) येथे तीन घरांवर धाड टाकून सागवानच्या लाकडासह जंगली डुक्कराचे मटन जप्त करून तीघांना ताब्यात घेतल्याची माहिती वनक्षेत्रपाल रत्नाकर ओब्बन्नावर यांनी दिली.
मिळालेल्या माहितीवरून कृष्णनगर येथील गंगाराम बोडके यांच्या घरी छापा मारला असता त्यांच्या घरी सहा नग सागवानसह सुमारे अर्धा किलो डुक्कराचे मटन आढळून आले. धोंडू गावडे यांच्याकडे १० नग तर ज्ञानेश्वर बम्मू वरक यांच्याकडेही सागवानचे नग आढळून आले. त्यांच्यावर वन खात्याच्या कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सुरू असल्याचे रत्नाकर ओबन्नावर यांनी ‘समांतर क्रांती’ला सांगितले.


‘सेक्स’ करायचे मिळतील हजारो रुपये! तुम्हालाही असा कॉल आलाय का?
समांतर क्रांती वृत्त महिलांची ‘कामइच्छा’ पूर्ण करा आणि कमवा हजारो रूपये, असा कॉल तुम्हालाही आलाय का? एकाकी महिला आणि तरूणींसोबत सेक्स करण्याचे हजारो रुपये मिळतील, असे कॉल सध्या अनेकांच्या मोबाईलवर येत असल्याने अनेकजन हैराण तर कांहीजन खूष झाले आहेत. प्रत्यक्षात हा ‘मामला’ काय आहे? आमच्या एका वाचकाला एक कॉल आला, त्यात समोरून बोलणारी व्यक्ती ‘स्वत: […]