
समांतर क्रांती / बम्मू फोंडे
He reached the crematorium even before being born. His mother also met with an unfortunate death. अपुऱ्या आरोग्य सेवा सुविधामुळे दुर्गम भागातील रुग्णांचे हाल नेहमीच आरोग्य व्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगत असतात. तरीही शासन व्यवस्थेला सर्वसामान्यांची दया येत नाही. लोक किड्यामुंग्यांसारखे मरत असतांना जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधी लोकांना न्याय देऊ शकत नाहीत. त्यामुळे अनेकांचे जीवन कवडीमोल बनले आहे. अशाच एका घटनेत रोहिणी हणबर या गर्भवतीचा बळी गेले. तीच्या मृत्यूने सरकारच्या आरोग्य यंत्रनेतील बेफिकीरपणा उघड्याबर पाडला आहे. त्यामुळे सरकार असे किती बळी घेणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
रामनगर भागात गेल्या तीन वर्षात गर्भावती महिला व त्यांच्या मुलांचा मृत्यू झाल्याची ही तिसरी घटना आहे. तालुक्यात आरोग्य सेवेसाठी मोठ्या इमारती बांधल्या असल्या तरी डॉक्टरांची आणि अत्याधुनिक सुविधांची कमतरता असल्याने वेळेवर उपचार मिळत नाहीत, त्यामुळे अनेकांना जीवाला मुकावे लागत आहे.

रोहिणी हणबर हिला जगलबेट येथून दांडेली येथे उपचारासाठी नेताना रस्त्यावरील मोठं मोठ्या खड्ड्याचा सामना करावा लागला. त्यानंतर दांडेली आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केल्यानंतर तिथेही वेळेवर उपचार मिळाले नाहीत, उलट सकाळी डॉक्टरांनी तीला उपचारासाठी धारवाडला पाठविले. मात्र वाटेतच तीचा मृत्यू झाला. जेव्हा आरोग्य केंद्रात दाखल केले. तेव्हाच डॉक्टरांनी तपासणी करून वेळेवर उपचार केले असते किंवा योग्य सल्ला दिला असता तर रोहिणी हिचा जीव वाचला असता असा आरोप तीचे पती मनोज हणबर व नातेवाईकांनी केला आहे.
हल्याळ येथे रस्त्यावर तीचा मृत्यू झाल्यानंतर शवचिकित्सा करण्यासाठी मृतदेह कारवार जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. तिथे शव चिकित्सा केल्यानंतर बुधवारी (ता. १०) मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. दुपारी तीच्यावर जगलबेट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान दांडेली येथील डॉक्टरांनी रोहिणी हिचा मृत्यू प्रसूतीच्या कारणामुळे झाला नसल्याचा दावा केला आहे.
जोयड्याचा वनवास कधी संपणार?
जोयडा तालुक्यात रामनगर आणि जोयडा येथील सरकारी आरोग्य केंद्र आहेत. पण येथे आवश्यक साधन सुविधा नाहीत, डॉक्टर नाहीत. सरकारी आरोग्य केंद्रात डॉक्टर नसल्याने येथील रुग्ण उपचारासाठी बेळगाव, बांबोली, हुबळी – धारवाडला जात आहेत. मात्र त्यांना वेळेवर उपचार न मिळाल्यास मृत्यूला सामोरे जावे लागते. पण यांचे दुखणे इथल्या राजकर्त्यांना, समाजसेवाकांना कधीच दिसले नाही. त्यांना लोकांचे प्रश्न, समस्या कधीच मांडाव्याशा वाटल्या नाहीत.
आतातरी आमदार साहेब लक्ष देणार का?
काही महिन्यापूर्वी एका महिला पत्रकाराने स्थानिक आमदार आर. व्ही. देशपांडे यांना रस्त्यावरील खड्डे आणि गर्भावती महिलांना या रस्त्यावरून प्रवास करताना होणाऱ्या वेदना या विषयी प्रश्न विचारला होता. त्यावेळी आमदाराने काय उत्तर दिले होते, हे सर्वांनी पाहिले आहे. त्याच मतदार संघात रोहिणी आणि तीच्या बाळाला आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे आतातरी हे मुर्दाड आमदार याकडे लक्ष देणार का? असा सवाल स्थानिक लोकांकडून विचारला जात आहे.

गाव बसा नही, लुटेरे आ गये लुटने..
समांतर क्रांती / चेतन लक्केबैलकर खानापूर तालुक्यात भ्रष्टाचाराने कळस केला आहे. लोकप्रतिनिधी, त्यांचे दलाल कार्यकर्ते आणि अधिकाऱ्यांनी सर्वसामान्यांना लुबाडण्याचा ‘धंदा’च सुरू केला आहे. जनतेने सुध्दा हतबल होऊन शिष्टाचार म्हणून स्विकारल्यामुळे त्यांची लूट केली जाते, याबाबत त्यांना कांहीच वाटत नाही. गेल्या महिनाभरातील प्रकरणांवर नजर टाकल्यास भ्रष्टाचाराने कोणती पातळी गाठली आहे, याची प्रचिती येते. घटना १ : […]