समांतर क्रांती / खानापूर

चालत जाणाऱ्या तरुणाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारदरम्यान मृत्यू झाला. ही घटना खानापूर – जांबोटी मार्गांवर सोमवारी (ता. 17) घडली होती. शिवम संजय कुंभार (17, रा. नागूर्डावाडा) असे या तरुणाचे नाव आहे.
शिवम हा नेहमीप्रमाणे घरापासून मोदेकोप फाट्यापर्यंत फिरायला गेला होता. तो घरी परत येत असताना त्याला मागून अज्ञात वाहणाने धडक दिली. त्यात तो गंभीर जखमी झाला.
त्याला तात्काळ आधी खानापूर शासकीय इस्पितळात दाखल करण्यात आले. अधिक उपचारासाठी त्याला बेळगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण, उपचाराला प्रतिसाद न दिल्याने त्याचा उपचारदरम्यान मंगळवारी (ता. 18) मृत्यू झाला. या घटनेबद्दल परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. खानापूर पोलिसात घटनेची नोंद झाली असून अज्ञात वाहणाचा शोध पोलीस घेत आहेत.


प्रबोधनकार वाचनायलातर्फे प्रबोधनकारांना अभिवादन
समांतर क्रांती / खानापूर थोर विचारवंत, समाजसुधारक, साहित्यिक आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील आग्रणी पत्रकार केशव सीताराम ठाकरे यांचा आज स्मृतिदिन. यनिमित्ताने येथील मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठान संचालित प्रबोधनकार ठाकरे वाचनालयात त्यांना अभिवादन करण्यात आले. प्रारंभी प्रतिष्ठानचे अध्यक्ष नारायण कापोलकर आणि खजिनदार ईश्वर बोबाटे यांनी प्रबोधनकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. सचिव वासुदेव यांनी प्रबोधनकरांच्या कार्याचा आढावा घेताना […]