
समांतर क्रांती / खानापूर
शहरातील सर्व्हे क्र. ९३/६/१ ही जमिन गायरान म्हणून नोंद असतांना तेथे कांहीनी अतिक्रमण करून बेकायदा बांधकाम केल्याचा आरोप करीत आंबेडकर ब्रिगेडने तहसील कार्यालयावर हालगी मोर्चा काढला. विनाविलंब जमिनीची सरकारदरबारी नोंद करावी तसेच बेकायदा बांधकाम भूईसपाट करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
शाहूनगरच्या बाजुला असलेली सदर जमिनीचा वाद न्यायालयात प्रलंबीत आहे. ही गायराम जमिन असूनही कांहीनी तेथे अतिक्रमन करून बांधकामे उभारली आहेत. १८ जून रोजी झालेल्या नगर पंचायतीच्या सामान्य सभेत ही बांधकामे पाडण्याचा ठरावदेखील पारित करण्यात आला होता. असे असतांना कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. तहसीलदारांनी याप्रकरणी पुढाकार घेऊन न्यायालयात बाजू मांडावी. तसेच जमिन सरकारदरबारी नोंद करावी. तत्पूर्वी बेकायदा बांधकाम पाडावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
विनाविलंब कारवाई न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. आंबेडकर ब्रिगेडचे अध्यक्ष लक्ष्मण मादार यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात राम कुडाळे, दीपक सोनटक्के, राजू सोनटक्के, हणमंत सोनटक्के, सुनील सोनटक्के, दिदलीप सोनटक्के यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.


खानापुरातून दुचाकीची चोरी
समांतर क्रांती / खानापूर नुकताच खानापूर पोलिसांनी मोठी कारवाई करीत चार वेगवेगळ्या चोरीच्या गुन्ह्यात तीन चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या असतांना अद्यापही शहरातील चोरीच्या घटनांना ब्रेक लागलेला नाही. दोन दिवसांपूर्वी शहरातील पेट्रोल पंपवर लावलेली दुचाकी चोरट्यांनी लांबविली आहे. मणतुर्गा येथील विठ्ठल शांताराम पाटील यांनी हिरोहोंडा – स्प्लेंडर दुचाकी (KA22 EG9891) पेट्रोलपंपवर लावली होती. ती अज्ञातांनी चोरली आहे. […]