
समांतर क्रांती / खानापूर
Citizens are suffering unnecessarily due to unprofessional work carried out in many places. In addition, there is a risk of accidents. ‘सरकारी काम सहा महिने थांब’ ही म्हण प्रचलित असतांनाच ‘करायला गेले सोय, झाली गैरसोय’ अशी नवीच म्हण खानापूर तालुक्यात रुढ होऊ लागली आहे. अनेक ठिकाणी अवैद्यानिकरित्या झालेल्या कामांमुळे नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. शिवाय अपघातांचा धोका निर्माण झाला आहे.
सरकारी बाबू आपल्या मर्जीप्रमाणे काम करतात, पण त्यामुळे नागरीकांची होण्याऐवजी गैरसोयच अधिक होते. रुमेवाडी-शिरोली मार्गावर रेल्वे मार्गावरील फाटक काढून त्याठिकाणी बोगदा खोदून रस्ता करण्यात आला आहे. त्या भुयारी पुलात सध्या पाणी साचत असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. वाहनांच्या सोयीसाठी बोगद्यात खड्डा केला आहे. त्यात पावसाळ्यात पाणी साचणार याचा अंदाज आल्याने त्या खड्ड्यातील पाणी हलात्री नाल्यात सोडण्यासाठी जलवाहिनी जोडण्यात आली आहे. पण, नाल्याची पाणी पातळी वाढल्यानंतर खड्ड्यातील पाणी नाल्यात जाण्याऐवजी नाल्यातील पाणी खड्ड्यात भरून वाहतूक पूर्णत: बंद होत आहे.
खानापूर रेल्वे स्थानकाजवळ अंडरपाससाठी खोदाई करण्यात आली असून पावसात असोगा रस्ता खचला आहे. तसेच चिखल आणि खड्ड्यांचे सामाज्य्र याठिकाणी प्रस्तापित झाल्यामुळे अपघातांची संख्या वाढली आहे. मोठ्या पावसात हा रस्तादेखील बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, या दोन्ही ठिकाणी सोयीच्या नावाखाली गैरसोय करून प्रवाशांना नाहक त्रासस देण्याचेच रल्वे प्रशासनाने ठरविले आहे काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
या समस्यांबाबत खासदार आणि आमदारांना निवेदने दिल्यानंतरही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. भीक नको, पण कुत्रा आवर अशी प्रवाशांची गत झाली असून दोन्ही रस्ते बंद झाल्यास शिरोली भागातील वीसहून अधिक गावांचा खानापूरशी संपर्क तुतो. त्याचा दैनंदिन व्यवहारांवर परिणाम होत आहे. दोन्ही ठिकाणाच्या समस्या दूर करण्याची मागणी या भागातील नागरिकांतून होत आहे.
__________________________________________________________________
रेल्वे प्रशासनाने आधीच अंडरपासच्या (भुयारी पूल) कामासाठी वेळकाढूपणा केला. त्यामुळे प्रवाशांना धूळ – मातीचा सामना करीत असोगा रस्त्याने प्रवास करावा लागत होता. आता अंडर पासमध्येच पाणी साचून रस्ता बंद होत आहे. असोगा रस्त्याची दयनीय आवस्था झाली आहे. खासदार-आमदारांनी याकडे लक्ष द्यायला हवे.
- ईश्वर बोबाटे, काँग्रेस नेते-मणतुर्गा


DCC Bank : खानापुरात होणार ‘काँग्रेस-भाजप’ युती? कोण असेल उमेदवार?
समांतर क्रांती / खानापूर Will there be a ‘Congress-BJP’ alliance in Khanapur? Who will be the candidate? जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या राजकारणात दररोज नवनव्या घडामोडी घडत आहेत. आगामी निवडणूक भाजप विरुध्द भाजप आणि काँग्रेसविरुध्द काँग्रेस अशीच होणार हे ओपन सिक्रेट आहे. दरम्यान, काँग्रेसच्या आमदाराने भाजपच्या आमदारांशी संधान बांधल्याची चर्चा असून दोघांमध्ये दिलजमाई झाली आहे. भाजपचे आमदार […]