
समांतर क्रांती / बेळगाव
म. ए. समिती नेते नेताजी जाधव यांच्या अमृत महोत्सवी वाढसानिम्मित आयोजित कार्यक्रमाला आज गुरुवारी (ता. 16) महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) नेते आमदार जयंतराव पाटील यांनी हजेरी लावली. त्यांनी यावेळी महाराष्ट्र सीमावासियांसोबत असल्याचे सांगतानाच कर्नाटकी अन्यायाबद्दल विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांची भेट घेऊन तुमच्या मुख्यमंत्र्यांना समज द्या, अशी मागणी करू अशी ग्वाही दिली.
सीमाप्रश्न न्यायप्रविष्ट आहे. तो कधी सुटणार अशी विचारणा होते. पण देशाची न्यायव्यवस्था कशी आहे हे सगळ्यांनाच ज्ञात आहे. आता प्रश्न सुनावणीस येण्यासाठी रस्त्यावर आंदोलन करावे का? असा विचार मनात येतो. पण आपणाला न्याय मिळेल, याची खात्री बाळगा.
दोनच दिवसापूर्वी शुभम शेळके यांना कर्नाटकी पोलिसांनी जी वागणूक दिली, त्याची माहिती मिळाली. आम्हीही अस्वस्थ झालो. कर्नाटकतील सरकारने असे करायला नको. त्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना भेटून कर्नाटकतील त्यांच्या मुख्यमंत्र्यांनी मुजोरी थांबवावी अशी विनंती केली जाईल, असा दिलासा आमदार जयंतराव पाटील यांनी दिला.
लोकशाहीत सर्वाना बोलण्याचा अधिकार आहे तर आम्हालाही आमचे मत मांडू द्या. नाहीतर अराजक पसरेल. हे टाळायला हवे, असेही त्यांनी सांगितले. त्यांनी त्यांच्या भाषणात नेताजी जाधव यांच्या सीमालढ्यातील सहभागबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी समिती नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुणे टू कारवार; पर्यटकांना पर्वणी
समांतर क्रांती /जोयडा महाराष्ट्र सरकारतर्फे रामनगर – जोयडामार्गे सुरू करण्यात आलेल्या पुणे–पिंपरी ते कारवार या नवीन बससेवेचे आज जोयडा येथे उत्साहात स्वागत करण्यात आले. कारवारहून आलेल्या या बसचे पारंपरिक पद्धतीने पूजन व सजावट करण्यात आली. स्थानिक ग्रामस्थ, व्यापारी व समाजसेवकांच्या उपस्थितीत बससेवेचा शुभारंभ झाला. यावेळी जोयडा तालुका काळी पर्यटन विकास संस्थेचे अध्यक्ष विनय देसाई म्हणाले, […]