
समांतर क्रांती / खानापूर
येळ्ळूर येथील गुरुवर्य वाय. एन. मजूर फाउंडेशन आयोजित कब्बडी स्पर्धा नुकताच चांगळेश्वरी शिक्षण संस्था संचलित कारलगा हायस्कुलच्या मैदानावर उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत मुलांच्या गटात कारलगा हायस्कुल तर मुलींच्या गटात गणेबैल हायस्कुलचा संघ विजेता ठरला.
स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष वाय. एन. मजूकर होते. मार्केटींग सोसायटीचे अध्यक्ष श्रीशैल माटोळी, निवृत्त सैनिक विठ्ठल पाटील, मोहन पाटील, परशराम पाटील यांनी दिपप्रज्वलन केले. स्पर्धेचे उद्घाटन निवृत्त जवान परशराम पाटील यांनी केले तर ध्वजारोहन संस्थेचे सेक्रेटरी प्रसाद मजूकर व चांगळेश्वरी नोकर पतसंस्थेचे अध्यक्ष नरेंद्र मजूकर यांनी केले. मार्केटींग सोसायटीचे संचालक प्रकाश गावडे यांनी क्रीडाज्योत प्रज्वलित केली. मार्केटींगचे संचालक रफीक हलशीकर, मनोहर पाटील यांनी देवदेवतांच्या प्रतिमांचे पूजन केले. यावेळी मुख्याध्यापक ए. एम. पाटील यांनी सुत्रसंचालन केले तर शारिरीक शिक्षक ए.डी.घाडी यांनी आभार मानले.
अनेक संघांनी स्पर्धेत भाग घेतला होता. त्यात मुलांच्या गटात कारलगा हायस्कुल तर मुलींच्या गटातून गणेबैल हायस्कुलच्या संघांनी विजेतेपद मिळविले. दोन्ही संघांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषीके देऊन गौरविण्यात आले.

वाघवडे रस्त्यावरील वृंदावन सिटी प्राईडचा शुभारंभ; सोन्याचे नाणे मिळविण्याची सुवर्णसंधी
समांतर क्रांती / घरकूल विशेष बेळगाव शहरात घर व प्लॉटच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य नागरिकांसाठी परवडणारा पर्याय उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने विकास बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या वतीने वृंदावन सिटी प्राइड हा अत्याधुनिक निवासी प्लॉट प्रकल्प साकारण्यात आला आहे. या प्रकल्पाचा आज सोमवारी (ता.२६) प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून वाघवडे रोडवरील रंगडोळी बस स्टॉपसमोर शुभारंभ करण्यात आला. शुभारंभ […]