
समांतर क्रांती / खानापूर
तालुक्यातील कान्सुली येथील मराठी प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा समिती अध्यक्ष धोंडीबा चौकुळकर होते.
प्रारंभी अध्यक्ष धोंडीबा चौकुळकर आणि गावातील जवान यांच्याहस्ते ध्वजारोहन करण्यात आले. ग्रा. पं. अध्यक्षा पूजा चाळगोंडे यांनी घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले, तर महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन माजी ग्रा. पं. सदस्य टोपान्ना कालमणकर यांनी केले. शाळा सुधारणा समिती उपाध्यक्षा राधिका गवसेकर, मराठा मंडळ हायस्कुलचे अध्यक्ष रामा कालमणकर, बाबाजी नवलुचे, सदस्य मुंदाप्पा गावडे, महेश गावडे, सोमान्ना नागोंडे, शंकर किणयेकर, गिडाप्पा गुरव यांच्या हस्ते दिपप्रज्वन करण्यात आले.

यावेळी ग्रा. पं. अध्यक्षा पूजा चाळगोंडे यांनी विद्यार्थ्यांना मिठाईचे वाटप केले. प्रजासत्ताक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी विविध नृत्य प्रकार आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यावेळी पालक, शाळा सुधारणा समिती सदस्य तसेच गावातील तरूण मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक एस. बी. गावकर, शंकर नरसन्नावर, सौ. रेणुका चेतन लक्केबैलकर आणि प्रज्योती कुंभार यांनी परिश्रम घेतले. मुख्याध्यापक प्रल्हाद लोहार यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन केले.

अजित पवारांच्या विमानाला अपघात, तिघांचा मृत्यू
समांतर क्रांती / बारामती deputy cm ajit pawar dead in plane crash at baramati. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा लँडीगवेळी भीषण अपघात झाला. या अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याचे पीटीआयने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. अजित पवार जिल्हा परीषदेच्या निवडणूक नियोजनासाठी मुंबईहून बारामतीला गेले होते. या अपघातात अजित पवारांसह अन्य दोघांचा मृत्यू झाल्याचे पीटीआयने त्यांच्या वृत्तात […]