समांतर क्रांती / चेतन लक्केबैलकर
छ.शिवराय आणि छ. संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भीमगड अभयारण्यातील कृष्णापूर ते वाळपई रस्त्याला दांडगा इतिहास लाभला आहे. शेकडो वर्षांपासून गोवा आणि खानापूरचे संबंध जोपासणारा हा मार्ग आता लवकरच बंद होणार आहे.
लोंढा ते वास्को हा रेल्वे मार्ग आणि अनमोड आणि चोर्ला घाटातील महामार्ग सुरू होण्यापूर्वी गोव्याशी खानापूरचे दृढ संबंध जोडणारा केळघाट हा एकमेव मार्ग होता. याच मार्गावरून कदंबांनी गोव्यात प्रवेश केला असावा असा कयास आहे. कारण, या मर्गावरील नेरसे, कोंगळा, गवाळी आणि कृष्णापुरात सुध्दा कदंबकालीन मंदिरे आणि मूर्त्या आजही पहावयास मिळतात. वाळपई-तांबडी सर्ल येथील हलशी येथील मंदिर स्थापत्यकलेचा वारसा जोपासणारे मंदिर याची साक्ष देते.
पुरावे सापडले..
अलिकडेच गोव्यातील पुरातत्व खात्याला दोन पत्रे मिळाली आहेत. त्यातील उल्लेखावरून केळघाट रस्ता कित्येक वर्षांपासून वहिवाटीचा मार्ग होता हे सिध्द होते. २९ जानेवारी १७८९ रोजी १२ लोकांना केळघाट मार्गे शिरसीला पाठविण्याची परवानगी मागणारे पत्र आणि १३ नोव्हेंबर १७८९ रोजी केळघाट मार्गे सावनूर जाण्यासाठी पोर्तूगीजांकडे मागीतलेली परवानगी ही या रस्त्याचे ऐतिहासिक महत्व अधोरेखीत करते.
छ. शिवरायांचाही झाला पदस्पर्श..
भीमगडावर छ. शिवाजी महाराज आणि छ. संभाजी महाराजांनी वास्तव्य केल्याचे पुरावे आहेत. त्याला दुजोरा देणारी आणखी एक बाब म्हणजे मास्टर ऑफ कारवार यांनी तत्कालीन सुरतच्या प्रसिंडेंटना १४ मार्च १६६५ रोजी लिहिलेले पत्र होय. छ. शिवराय. छ. संभाजी राजे, मुघल आणि इतरांनी याच मार्गाने ये-जा करीत भीमगडावर वास्तव्य केले होते.
मार्ग कोठून कुठे जातो?
केळघाट हा शेकडो वर्षांचा इतिहास लाभलेला मार्ग थेट कित्तूरपर्यंत आहे. वाळपई ते कित्तूर असा हा मार्ग पोर्तूगीज काळात व्यवसायाचा महामार्ग बनला होता. १८०३ साली खानापूरची बाझार पेठ नंदगडला स्थलांतरीत झाली. त्यानंतर गोव्यातील व्यापारी नारळ, मीठ, मासे, सुपारी घेऊन केळघाट मार्गे नंदगडला येत. कांही व्यापारी कित्तूर, धारवाड आणि बागलकोटला सुध्दा जात असत. त्यातूनच या बाजार पेठा फुलत गेल्या. गोव्यातील तत्कालीन व्यापारी येथून सुती कपडे, जीवनावश्यक वस्तू घेऊन जात असत. तशी नोंद ब्रिटीश अभ्यासक डॉ. थोमस यांनीही नोंदविली आहे.
आजही अस्तित्वात आहे हा मार्ग..
वाळपई ते कित्तूर हा मार्ग आजदेखील अस्तित्वात आहे. कृष्णापूर, केळील, तळेवाडी, हेम्माडगा, शिरोली, सावरगाळी, अनंदगड, नंदगड ते कित्तूर असा हा ऐतिहासिक मार्ग आहे.

चाकुने वार करून तरूणाची निर्घूण हत्या
समांतर क्रांती / बेळगाव बसमधून उतरून कामावर जात असतांना तरूणावर चाकुने सपासप वार करून हत्या करण्यात आल्याची घटना आज गुरूवारी (ता.१८) सकाळी अथणी तालुक्यातील शहाबंदर येथे घडली आहे. महांतेश बुकनट्टी (२४) असे त्याचे नाव असून त्याचे एका महिलेशी अनैतिक संबंध असल्यावरून ही हत्या झाल्याचे समजते. हल्लेखोरांनी चाकुने सपासप वार केल्यानंतर महांतेश हा जागीच कोसळला. त्यानंतर […]