
समांतर क्रांती / खानापूर
मराठा मंडळ महाविद्यालय ते करंबळ फाट्यापर्यंतच्या शहरांतर्गत महामार्गाच्या कामात मोठा गैरव्यवहार होत असल्याचा आरोप सर्वच स्तरातून करण्यात येत आहे. रस्ताकामासाठी तब्बल १४ कोटींचा निधी मंजूर असतांना कंत्राटदाराने धुळफेक चालविली आहे. काँग्रेसने या प्रकाराला आमदार आणि खासदारांना जबाबदार धरत आराखड्याप्रमाणे रस्त्याचे काम करण्याची मागणी केली आहे.
‘वन टाईम डेव्हलपमेंट’मधून भक्कम रस्ता करण्याचे जाहीर करण्यात आले होते. आवघ्या चार कि.मी. रस्त्यासाठी तब्बल १४ कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. असे असतांना कंत्राटदाराने महाविद्यालयापासून हलकर्णी फाट्यापर्यंतचा रस्ता न खणता त्यावर डांबरीकरण सुरू केले आहे. आवघ्या कांही लाखांचा खर्च करून कोट्यवधींचा निधी घशात घालण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप कांही दिवसांपूर्वीच म.ए.समितीचे कार्याध्यक्ष मुरलीधर पाटील यांनी केला होता. तसेच काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष ॲड. ईश्वर घाडी यांनी नियमानुसार दर्जा न राखल्यास काम बंद पाडण्याचा इशारा दिला होता.
आरोप होत असतांनाही कंत्राटदाराने मनमानी चालविली आहे. त्याशिवाय भाजपचे नेते प्रमोद कोचेरी यांनी कंत्राटदाराचीच तळी उचलून धरत ‘दाल मे कुछ काला’ असल्याच्या काँग्रेसच्या आरोपांना जणू दुजोराच दिला आहे. सपूर्ण रस्ता एकसारखाच झाला पाहिजे, अशी मागणी खानापूर तालुका ब्लॉक कॉंग्रेसने केली आहे. जनतेने भरलेल्या टॅक्समधून हा निधी उपलब्ध झाला आहे. जनतेच्या प्रत्येक रुपयाचा सदुपयोग व्हावा, अशी अपेक्षा काँग्रेसकडून व्यक्त करण्यात आली आहे.
आमदार आणि खासदारांनी तात्काळ कंत्राटदाराला समज द्यावी. अन्यथा आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष ॲड. ईश्वर घाडी यांनी दिला आहे.

प्रबोधनकार ठाकरे वाचनालयाला कॉ. किशोर ढमालेसह मान्यवरांची सदिच्छा
समांतर क्रांती / खानापूर मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठान संचलित प्रबोधनकार वाचनालयाला कॉ. किशोर ढमाले, प्रा. प्रतिमा परदेशी, डॉ. मंजुश्री पवार यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांच्यासमवेत पत्रकार विकास पाटील, पत्रकार सुहास हुद्दार, म.ए.समितीचे नेते विलास बेळगावकर उपस्थित होते.कॉ. किशोर ढमाळे आणि प्रा. प्रतिमा परदेशी यांना राष्ट्रवीरकार शामराव देसाई पुरस्कार मिळाल्याबद्दल वाचनालयाच्यावतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले. सुरूवातीला […]