
समांतर क्रांती / खानापूर
आमदार विठ्ठल हलगेकर यांनी विधानसभा निवडणुकीत तालुक्यात शटल बससेवा सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. तालुक्यात शटल बससेवा तर सुरू झालीच नाही; त्याउलट बसअभावी विद्यार्थ्यांचा जीव मात्र टांगणीला लागला आहे. त्यामुळे आमदार साहेब, तालुक्यात हे काय चाललंय? असा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांकडून विचारला जात आहे.

येथील बस आगर समस्यांचे आगर बनले आहे. आधीच येथील आगाराला नादुरूस्त बसेस देऊन तालुकावासीयांच्या तोंडाला पाने पुसली गेली आहेत. नादुरूस्त बसेसमुळे विद्यार्थ्यांची कुतरओढ नेहमीचीच बनली आहे. नुकताच नादुरूस्त बसमुळे दूधाच्या टेंपोतून प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतल्याची घटना नंदगडजवळ घडली होती. एकंदर, खानापूर तालुक्यातील नागरीक आणि विद्यार्थ्यांचा प्रवास रामभरोसे चालला आहे.

बेळगाव-खानापूर मार्गावर वेळेत एकही बस नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना अक्षरश: बसल्या दरवाजात थांबून लोंबकळत प्रवास करावा लागतो. हीच स्थिती खानापूर – नंदगड मार्गावरील विद्यार्थ्यांची सुध्दा आहे. दररोज या मार्गावरील विद्यार्थ्यांना बसच्या दरवाजाला लोंबकळत प्रवास करावा लागत असल्याने त्यांच्या जीवीतास धोका निर्माण झाला आहे. आधीच तालुक्यातील रस्त्यांची चाळण झाली असतांना असा हा प्रवास म्हणजे अपघातांना निमंत्रणच ठरत आहे.
कुणाचेच कसे लक्ष नाही?
हायटेक बसस्थानकाच्या निर्मितीचे श्रेय लाटण्यासाठी माजी आमदार अरविंद पाटील, माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर हे पाठ थोपटून घेत होते. पण, आता त्यांनी हायटेक बसस्थानक झाल्यानंतर बस सेवेसंबंधी समस्या मार्गी लागल्याची स्वप्ने पडू लागल्याचे दिसते. आमदार विठ्ठल हलगेकर यांना तर तालुक्यात समस्या आहेत, त्या सोडविल्या पाहिजेत, याबाबत कोणतेच सोयर-सुतक राहिलेले नाही, अशी स्थिती आहे.


साताऱ्यातील डॉ. मृणालिनी यांची 'ट्रेक स्टोरी'
समांतर क्रांती / पर्यटन विशेष २०१३ साली चेन्नई एक्स्प्रस या हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला. रोहीत शेट्टीने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात आघाडीचे नट शारूख खान आणि नटी दिपीका पदुकोन यांनी काम केले होते. २०१३ साली हाऊसफुल्ल ठरलेला हा चित्रपट आताश: कुणाला आठवतही नसले. पण, त्या चित्रपटातील एका दृष्याने मात्र गोवा राज्याच्या हद्दीतील दूधसागर धबधबा मात्र अविस्मरणीय […]