समांतर क्रांती / खानापूर
Liquor worth Rs 15 lakh smuggled through sound box साऊंड बॉक्समध्ये बॉटल्स् भरून गोवा बनावटीच्या दारूची तस्करी करणाऱ्या एकावर अबकारी विभागाने कणकुंबी तपासणी नाक्यावर कारवाई केली आहे. वाहनचालक अक्षय सहदेव मॅगीनमनी (३०, रा. होसूर) याचा अटक करण्यात आली असून त्याच्याकडून १५ लाखांच्या दारूसह टेंपो जप्त केला आहे.
कणकुंबी तपासणी नाक्यावर अबकारी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केए २२ डी ३०३० हा माल वाहतूक टेंपो थांबवून तपासणी केली असता टेंपोमधील १० साऊंड बॉक्समध्ये ३४ दारूचे बॉक्स आढळले. वाहनचालकाची सखोल चौकशी करून त्यांला अटक करण्यात आली. त्याच्याकडून १५ लाख ६ हजार २४० रुपयांची सुमारे २८७ लिटर दारू जप्त करण्यात आली आहे.
ही कारवाई बेळगावचे अबकारी उपअधिक्षक रवी मुरगोड यांच्या मार्गदर्शनाखाली मंजुनाथ मेळ्ळीकेरी, जयराम हेगडे, बाळगौडा पाटील, मंजू मास्तमर्डी, यलगौडा पाटील यांनी केली.

म्हादई प्रकल्पाचा ३२.८५ कोटींचा निधी वन्यजीव संवर्धनासाठी..
समांतर क्रांती / बंगळूर भांडूरा नाला वळवण्याच्या प्रकल्पाला केंद्र सरकारने आक्षेप घेतल्यानंतर कर्नाटक राज्य सरकारने प्रकल्पाच्या रकमेच्या ५ टक्के रक्कम (३२.८५ कोटी) वन्यजीव संवर्धनासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. भांडुरा नाला वळवण्याच्या प्रकल्पाचे क्षेत्र भीमगड वन्यजीव अभयारण्याच्या अधिकारक्षेत्रात नाही. तथापि, या भागात वाघ, बिबटे आणि दुर्मिळ झाडे आहेत. त्यांच्या सवधर्धनासाठी प्रादेशिक कार्यकारी समितीने (REC) राज्य सरकारला […]