
समांतर क्रांती / खानापूर
एम.के.हुबळी येथील श्री मलप्रभा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक २८ सप्टेबर रोजी होणार आहे. याबाबतची अधिसूचना निवडणूक अधिकारी आणि कित्तूर विकास प्राधिकाराच्या आयुक्त प्रभावती फकीरपूर यांनी जारी केली आहे. अचारसंहिता जारी करण्यात आली असून खानापूर आणि बैलहोंगल तालुक्यातील राजकारण पुन्हा एकदा रंगणार आहे.
निवडणूक वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून १३ ते २० सप्टेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज स्विकारले जाणार आहेत. २८ रोजी निवडणूक व त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. १५ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. त्यात सामान्य वर्ग ०९, महिलांसाठी राखीव ०२ तर अनुसूचीत जाती, जमाती, अ वर्ग आणि ब वर्गासाठी प्रत्येकी एका जागेचा समावेश आहे.
मलप्रभा साखर कारखान्याचे बैलहोंगल आणि खानापूर तालुका हे कार्यक्षेत्र असून खानापूर तालुक्यातील सभासदांची संख्या मोठी आहे. अलिकडे कारखान्यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याच्या आरोपावरून कारखाना चर्चेत आला आहे. तरीही या कारखान्याच्या निवडणुकीत खानापूर तालुक्याचे नेहमीच वर्चस्व राहिल्याने यावेळीदेखील निवडणूक रंगतदार ठरण्याची शक्यता आहे.


अनोखा गणेशोत्सव: विसर्जनानंतर केली जाते गणेशाची पुनर्प्रतिष्ठापणा..
समांतर क्रांती / चेतन लक्केबैलकर खानापूर तालुक्याच्या पश्चिम घाटातील अनेक गावांच्या रस्त्यावर एखादी गणेशमूर्ती वर्षभर पहावयास मिळते. शेडू-मातीची ही मूर्ती पर्यटकांच्या कुतूहलाचा विषय ठरतो. त्याबद्दल अनेक तर्कवितर्क सुध्दा वर्तविले जातात. पण, आज आम्ही सांगतोय, यामागची सत्यकथा.. खानापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील कणकुंबी, पारवाड, चिखले, चिगुळे, हुळंद, मान, चोर्लासह अनेक गावांच्या रस्त्याकडेला गणेश मूर्ती दिसतात. कांहींना छोटेशे […]