
समांतर क्रांती / खानापूर
अनेक दशकांपासून हजारो विद्यार्थ्यांना घडविणाऱ्या मणतुर्गा येथील मराठी शाळेच्या इमारतीचे नुतनीकरण करण्याचा संकल्प आज शुक्रवारी (ता.१५) स्वातंत्र्यदिनी करण्यात आला. यावेळी शाळा सुधारणा समितीच्या सदस्यांनी शाळेच्या उभारणीसाठी देणग्या दिल्या.
स्वातंत्र्यदिनानिमित्त शाळेच्या आवारात शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष ईश्वर बोबाटे यांच्याहस्ते करण्यात आले. तर महात्मा गांधीच्या प्रतिमेचे पूजन उपाध्यक्ष नारायण पाटील व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक एम.एम.देवकरी यांनी केले. याप्रसंगी नंजीनकोडल ग्राम पंचायतीतून निवृत्त झालेले विकास अधिकारी सूर्याजी देवकरी यांचा सत्कार करण्यात आला. शाळेच्या विद्यार्थ्यांनी यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.

याप्रसंगी बोलतांना शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष ईश्वर बोबाटे यांनी शाळेच्या वर्गखोल्या मोडकळीस आल्या आहेत. त्यांच्या डागडुजीची आवश्यकता आहे. सरकारकडून निधी मिळत नसल्याने हे काम गेल्या अनेक वर्षांपासून रखडले आहे. त्यामुळे आता सर्वांनीच शाळेच्या उभारणीसाठी पुढाकार घ्यायला हवा, असे मत मांडले.
शाळेच्या नुतनीकरणाचा विषय मांडल्यानंतर शाळा सुधारणा समितीच्या सदस्यांनी देणग्या जाहीर केल्या. ईश्वर बोबाटे यांनी या शाळेत शिकलेल्या माजी विद्यार्थ्यांनी तसेच गावकरी आणि दानशूर व्यक्तींनी सढळहस्ते आर्थिक मदत करावी, असे आवाहन केले आहे. स्वातंत्र्यदिनी मणतुर्गा शाळेच्या शाळा सुधारणा समितीने मराठी शाळा इमारतीच्या नुतनीकरणाचा संकल्प केल्याबद्दल त्यांचे कौतूक होत आहे.

कान्सूली मराठी शाळेत स्वातंत्रोत्सव उत्साहात
समांतर क्रांती / खानापूर तालुक्यातील कान्सूली येथील प्राथमिक मराठी शाळेत 79 स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष शंकर किनयेकर यांनी ध्वजारोहण केले. यावेळी महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. स्वातंत्र्य दिनाचे औचीत्य साधून रोटरी क्लब ऑफ बेळगामने दिलेल्या दोन संगणकाचे हस्तानंतरण करण्यात आले. शाळेच्यावतीने […]