
समांतर क्रांती / खानापूर
कुटुंब व्यवस्थाच काळाच्या पडद्याआड जात असतानाच्या काळात मणतुर्गा येथील बोबाटे कुटुंबियांनी स्नेहमिलानातून नात्याची वीण अधिक घट्ट करीत एक अनोखा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. मराठी संस्कृतिक प्रतिष्ठानचे खजिनदार ईश्वर बोबाटे यांनी यासाठी पुढाकार घेतला.
स्पर्धेच्या युगात नाती केवळ नावापुरतीच शिल्लक राहिली आहेत. कामाच्या धबागड्यात भाऊ -बहीण आणि नातेवाईक एकत्र येणे दुरापास्त झाले आहे. अश्या स्थितीत आपले कुटुंब एकत्र आले पाहिजे. आपल्या कुटुंबातील नव्या पिढीला कुटुंब व्यवस्था जवळून पाहता यावी. नात्यांची वीण घट्ट व्हावी, या हेतूने बोबाटे कुटुंबियांनी मातोश्री श्रीमती कांचना मंगेश बोबाटे यांनी 85 व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल नुकताच आगळवेगळा आदर्श असा स्नेहमिलन कार्यक्रम आयोजित केला होता.
यावेळी श्रीमती कांचना बोबाटे यांचे त्यांच्या नातवंडानी अभिष्टचिंतन केले. तसेच सौ. लक्ष्मी व परशराम मंगेश बोबाटे, सौ. वनिता व विष्णू संभाजी देसाई (शिंगरगाव ), सौ. लक्ष्मी व सातेरी दत्तू पाटील (गर्लगुंजी), सौ. राजश्री व ईश्वर मंगेश बोबाटे यांचाही मुले-मुली आणि भाचे-भाचीनी सत्कार करून कृतज्ञता व्यक्त केली. आपल्या कुटुंबातील लहान मुलांना प्रोत्साहित करण्यासाठी बोबाटे यांची भाची कु. सुस्मिता सातेरी पाटील हिचा एल. एल. बी. उत्तम श्रेणित उत्तीर्ण करून वकिली सेवेत रुजू झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी प्रदीप परशराम बोबाटे यांनी आभार मानले. स्नेहभोजनसह आयोजित करण्यात आलेल्या या स्नेहमीलन कार्यक्रमात बोबाटे कुटुंबातील चिमुकल्यानी सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून बहर आणली. कुटुंब व्यवस्था लोप पावत असताना बोबाटे कुटुंबियांनी आयोजित केलेल्या या कौटुंबिक सोहळ्याने एक अगळावेगळा आदर्श समजसमोर ठेवला आहे.
याबाबत समांतर क्रांतीशी बोलताना ईश्वर बोबाटे म्हणाले, या स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने तीन पिढ्या एकत्र आल्या. आपल्या कुटुंबियांत स्नेह दृढ व्हावा आणि नव्या पिढीला नात्यांचे महत्व कळावे हा या कार्यक्रम आयोजनामागील उद्देश होता. यामुळे कुटुंबातील सर्वांचाच आनंद द्विगुणित झाला. लहानांना एकमेकांना एकमेकांची गळाभेट घेता आली.


वर्षाच्या शेवटच्या दिवशी आयुष्याचा शेवट
समांतर क्रांती / खानापूर # KHANAPUR: The end of life on the last day of the year. सर्वत्र जुन्या वर्षाला निरोप दिला जात असतांनाच वर्षाच्या शेवटच्या दिवशी एका तरूणाच्या आयुष्याचा शेवट झाला. ही धक्कादायक घटना खानापूर तालुक्यात घडली असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. संरक्षक कठड्याला दुचाकी आदळल्याने झालेल्या अपघातात येथील निंगापूर गल्लीतील सुरज […]