
समांतर क्रांती / खानापूर
दरवर्षीप्रमाणेच यंदाही येथील मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी तालुक्यातील प्रयोगशील शिक्षकांसह पुणे जिल्हातील जालिंधरनगर येथील जिल्हा पंचायत शाळेला भेट दिली.
जालिंधर नगर येथील जिल्हा पंचायतीची शाळा आंतरराष्ट्रीय दर्जाची आहे. पूर्वी या शाळेत केवळ १२ विद्यार्थी आणि दोन मोडकळीस आलेल्या खोल्या होत्या. पण, दत्तात्रय वारे गुरूजींनी तेथे परिवर्तन घडवून आणून शाळेला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवून दिला. आजघडीला या शाळेत १४० विद्यार्थी आहेत. या शाळेतील विद्यार्थ्यांना तब्बल १६ भाषा अवगत आहेत. तेथे पुस्तकी अभ्यासक्रमाबरोबरच तंत्रज्ञान, संगणक आणि शेती याचेही ज्ञान दिले जाते. अशा या शाळेला प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि शिक्षकांनी भेट देऊन शैक्षणिक प्रयोगशील समजून घेतली.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय वारे यांनी शिष्ठमंडळाचे स्वागत करून शाळेतील उपक्रमशीलतेची माहिती दिली. यावेळी मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष नारायण कापोलकर, सहसचिव प्रल्हाद मादार, खजिनदार ईश्वर बोबाटे, शिक्षक मोहन .व्ही. पाटील, सीआरपी सतिश पाटील आणि तालुक्यातील शिक्षक उपस्थित होते.
छ. संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन
शिष्ठमंडळाने पुणे येथील शिक्षण तज्ज्ञ आणि खानापूर-बेळगाव मित्रमंडळाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. तसेच वढू बुद्रूक येथील छ. संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. दरवर्षी प्रतिष्ठानकडून शिक्षकांसाठी प्रयोगशील शाळांचा दौरा आयोजित करण्यात येते.

क्रुरतेचा कळस: पत्नीचा खून करण्यापूर्वी पतीने गुप्तांगात तप्त..थरकाप उडवणारा घटनाक्रम
समांतर क्रांती / खानापूर The height of cruelty: Before murdering his wife, the husband inserted a heated object into her genitals… a shocking sequence of murder. चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीचा क्रुरपणे खून केल्याची घटना मंगळवारी (ता.२०) कापोली येथे उघडकीस आली. या घटनेतील संशयीत आरोपी अविनाश बाळेकुंद्री याने क्रुरतेची परिसीमाच ओलांडल्याचे शवचिकित्सेदरम्यान दिसून आले आहे. हा […]