
समांतर क्रांती / चेतन लक्केबैलकर
नेहमीच ‘लाईम लाईट’मध्ये राहणाऱ्या शिक्षण संस्था चालकांनी ‘चमकोगिरी’ करीत मराठी भाषीक शिक्षक आणि विद्यार्थ्यांना वेठीस धरल्याच्या घटनेबद्दल तिव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. कर्नाटक सरकारचा पुरस्कार मिळाल्याबद्दल सदर संस्थेच्या अध्यक्षांचा सत्कार मंडळाच्या शाळांच्यावतीने आयोजित करण्यात आला. त्यात शिक्षकांना ‘लाल-पिवळा’ परिधान करण्याची सक्ती करण्यात आली होती.
खानापूर तालुक्यातील जनतेने सुप आणि पसाभर धान्य आणि जमिनी दान देऊन ज्या मराठा मंडळ संस्थेच्या शाळा सुरू केल्या. त्या संस्थेच्या अध्यक्षा नेहमीच तुघलकी निर्णय घेऊन स्थानिक शिक्षक आणि विद्यार्थ्यांना पिडत असतात. कांही वर्षांपूर्वी त्यांनी शहरातील मुलींच्या शाळेतील विद्यार्थींचा पोशाख बदलून पालकांच्या संतापाच्या धनी झाल्या होत्या. त्यानंतर गतवर्षी दहावीच्या निकालाने संस्थेची लक्तरे पार वेशीवर टांगली. त्यानंतर शिक्षकांना जबाबदार धरण्यात आले.
आता तर चक्क त्यांनी कानडीचा कैवार घेत चक्क चमकोगिरी केली. गुरूवारी संस्थेच्या अध्यक्षा राजश्री हलगेकर-नागराजू यांचा ‘कर्नाटक राज्योत्सव पुरस्कार’ मिळाल्याबद्दल सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी शिवस्मारकातून ढोल-ताशांच्या मिरवणुकीद्वारे त्यांचे स्वागत करण्यात आले. या मिरवणुकीत सहभागी झालेल्या सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांना गळ्यात लाल-पिवळी शाल घालण्याची आणि हातात तोच ‘कर्नाटकी’ झेंडा घेण्याची सक्ती करण्यात आली होती. मिळालेल्या माहितीनुसार लाल-पिवळा शाल न घालणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा इशारा देण्यात आला होता.
संस्थेच्या खानापूर तालुक्यातील बहुतेक शाळा मराठी माध्यमाच्या आहेत. त्या शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांना सुध्दा लाल-पिवळ्याची सक्ती करण्यात आली होती. केवळ नोकर म्हणून शिक्षकांनी ही सक्ती सहन केली असली तरी त्याबद्दल तिव्र नाराजी व्यक्त होत आहे.
मराठी जिवावर..
मराठा मंडळ ही शिक्षण संस्था मराठी भाषीकांच्या जिवावर मोठी झाली आहे. पण, राजश्री नागराजू-हलगेकर यांच्याकडे संस्थेची सुत्रे गेल्यानंतर त्यांनी कानडीकरणाचा जणू विडाच उचलला आहे. त्याची उतराई म्हणून त्यांना राज्योत्सव पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. आता त्या कर्नाटकी सरकारच्या इतराईसाठी चक्क मराठी भाषकांचेच कानडीकरण चालविले आहे. हा प्रकार संतापजनक असल्याचे मत मराठी भाषकांतून व्यक्त होत आहे.


क्लबला आग: 23 जणांचा मृत्यू
समांतर क्रांती / पणजी गोव्यात एका नाईट क्लबमध्ये आग लागून 23 जणांचा मृत्यू झाल्याची घटना रात्री घडली. या घटनेने संपूर्ण गोवा हदरला आहे. सिलेंडर स्फोटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यामध्ये काही पर्यटकांचा समावेश आहे. मृतांमध्ये बहुतेक जण तिथे काम करणारे क्लब कर्मचारी होते. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आगीचे कारण सिलेंडरचा स्फोट […]